Home | Jeevan Mantra | Dharm | shravan somvar pujan vidhi in marathi

पहिला श्रावण सोमवार : सुख-समृद्धीसाठी अशाप्रकारे करा महादेवाची पूजा

रिलिजन डेस्क | Update - Aug 13, 2018, 12:03 AM IST

सध्या श्रावण महिना सुरु असून आज (13 ऑगस्ट) पहिला श्रावणी सोमवार आहे. महादेवाची कृपा प्राप्त करण्यासाठी शिवलिंगावर दररोज

 • shravan somvar pujan vidhi in marathi

  सध्या श्रावण महिना सुरु असून आज (13 ऑगस्ट) पहिला श्रावणी सोमवार आहे. महादेवाची कृपा प्राप्त करण्यासाठी शिवलिंगावर दररोज जल अर्पण करणे आवश्यक आहे. विशेषतः श्रावणातील प्रत्येक सोमवारी महादेवाची विशेष पूजा करावी. या उपायाने महादेवाची कृपा प्राप्त केली जाऊ शकते. देवाच्या कृपेने सर्व इच्छा पूर्ण होऊन अडचणी दूर होऊ शकतात. येथे जाणून घ्या, सोमवारी महादेवाची पूजा करण्याचा सामान्य विधी...


  असे करावे महादेवाचे पूजन
  सोमवारी सकाळी लवकर उठून स्नान करून पवित्र व्हावे. त्यानंतर महादेवाच्या मंदिरात जाऊन किंवा घरीच व्रत करण्याचा संकल्प करावा. या व्रतामध्ये एकदाच रात्री जेवण करावे. दिवस फलाहार तसेच दुध घेऊ शकता.


  संकल्प घेतल्यानंतर शिवलिंगावर जल आणि गायीचे दुध अर्पण करावे. त्यानंतर फुल, तांदूळ, कुंकू, बेलाचे पान अर्पण करावे. या सर्व गोष्टी अर्पण करताना शिव मंत्र - ऊँ महाशिवाय सोमाय नम: किंवा ऊँ नम: शिवाय। या मंत्राचा जप करा.

  जप करण्यासाठी रुद्राक्षाची माळ श्रेष्ठ ठरते. या सोप्या पद्धतीने महादेवाची पूजा करून त्यांची कृपा प्राप्त करू शकता.

Trending