आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

श्रावण : नागपंचमीला केली जाते नागाची विशेष पूजा, मूर्तीवर अर्पण करावे दूध

एका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

सध्या श्रावण मास सुरु आहे आणि सोमवार 5 ऑगस्टला नागपंचमी साजरी केली जाईल. या दिवशी नागदेवाची विशेष पूजा केली जाते. बहुतांश लोक या दिवशी नागाला दूध पाजतात, परंतु असे करू नये. दूध सापाची विषसमान आहे. यामुळे जिवंत सापाला नाही तर नागदेवाच्या मूर्तीला दूध अर्पण करावे. महादेव गळ्यामध्ये नाग धारण करतात. येथे उज्जैनचे ज्योतिषाचार्य पं. मनीष शर्मा यांच्यानुसार जाणून घ्या, महादेव आपल्या नागाच्या माध्यमातून कोणता संदेश देतात...

महादेव गळ्यात साप धारण का करतात?
महादेव जेवढे रहस्यमयी आहेत तेवधेच त्यांचे वस्त्र आणि आभूषण विचित्र आहेत. संसारिक लोक या गोष्टींपासून दूरच राहतात. महादेव त्याच गोष्टी स्वतःजवळ बाळगतात. भगवान शिव एकमेव असे देवता आहेत, जे गळ्यात साप धारण करतात. वास्तवामध्ये साप एक धोकादायक प्राणी आहे, परंतु तो कोणालाही विनाकरण दंश करत नाही. साप परिस्थितिक तंत्राचा महत्त्वपूर्ण जीव आहे. लाईफ मॅनेजमेंट दृष्टीकोनातून पाहिल्यास महादेव गळ्यामध्ये साप धारण करून असा संदेश देतात की, जीवनचक्रात प्रत्येक प्राण्याचे विशेष योगदान आहे. यामुळे कधीही हिंसा करू नये.

महादेवाचे वाहन नंदी (बैल) का आहे?
महादेवाचे वाहन नंदी आहे. बैल अत्यंत कष्टाळू प्राणी आहे. हा प्राणी शक्तिशाली असूनही अत्यंत शांत आणि भोळा आहे. या व्यतिरिक्त नंदीला पुरुषार्थाचे प्रतिक मानले जाते. खूप कष्ट करूनही बैल कधीही थकत नाही. हा प्राणी सतत आपले कर्म करत राहतो. याचा अर्थ आपणही सदैव आपले कर्म करत राहावे. कर्म करत राहिल्यामुळे ज्याप्रमाणे नंदी महादेवाला प्रिय आहे, त्याचप्रकारे आपणही महादेवाची कृपा प्राप्त करू शकतो.

0