Home | Maharashtra | Mumbai | Shree Siddhivinayak Ganapati Temple Postal Ticket inaugurated by Chief Minister

श्री सिद्धिविनायक गणपती मंदिर टपाल तिकिटाचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण

प्रतिनिधी | Update - Sep 11, 2018, 08:34 AM IST

भारतीय डाक विभागातर्फे 'माय स्टॅम्प' या योजनेअंतर्गत प्रभादेवी येथील श्री सिद्धिविनायक मंदिराचे छायाचित्र असलेले टपाल

  • Shree Siddhivinayak Ganapati Temple Postal Ticket inaugurated by Chief Minister

    मुंबई- भारतीय डाक विभागातर्फे 'माय स्टॅम्प' या योजनेअंतर्गत प्रभादेवी येथील श्री सिद्धिविनायक मंदिराचे छायाचित्र असलेले टपाल तिकीट तयार करण्यात आले आहे. या तिकिटाचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले. या वेळी श्री सिद्धिविनायक गणपती मंदिर न्यासाचे अध्यक्ष आदेश बांदेकर, आमदार सदा सरवणकर, आमदार अनिल परब, कोषाध्यक्ष सुमंत घैसास यांच्यासह सर्व विश्वस्त, खासदार राहुल शेवाळे, विधी व न्याय विभागाचे प्रधान सचिव एन. जे. जमादार, रश्मी ठाकरे, मिलिंद नार्वेकर, शिवसेना सचिव आदी उपस्थित होते.


    मुख्यमंत्री म्हणाले, श्री सिद्धिविनायक हे तमाम मुंबई आणि महाराष्ट्राचे आराध्य दैवत असून दर्शनासाठी मोठ्या प्रमाणात भक्तगण येतात. मी श्री सिद्धिविनायकचरणी महाराष्ट्रावरची सर्व संकटे दूर करण्याची प्रार्थना केली आहे. श्री सिद्धिविनायकाच्या आशीर्वादाने महाराष्ट्र सातत्याने प्रगती करत राहील. हे तिकीट सर्वांच्या घरी शुभवार्ता घेऊन जाईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. या योजनेंतर्गत भक्तांना आपला स्वतःचा, परिवाराचा, मित्रांचा, नातेवाईक यांचा फोटो श्री सिद्धिविनायक मंदिर टपाल तिकिटाच्या अर्ध्या बाजूला प्रिंट करून मिळण्याची संधी उपलब्ध झाली आहे. या वेळी आदेश बांदेकर यांनीही आपली भूमिका मांडली.

Trending