आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराएंटरटेनमेंट डेस्क : जान्हवी कपूर अनेकदा वेगवेगळ्या कारणांमुळे ट्रॉलर्सच्या निशाण्यावर असते. यावेळी ड्रेस रिपीट केल्यामुळे सोशल मीडियावर तिला ट्रोल केले गेले. ट्रोल करणाऱ्यांना जान्हवीने सडेतोड उत्तर दिले आहे. अशातच जान्हवी एका चॅट शोमध्ये सहभागी झाली होती. या शोमध्ये तिने ट्रोल करणाऱ्यांना उत्तर दिले. ती म्हणाली - 'एवढे पैसे नाही कमवले की, रोज नवीन नवीन कापडे घालावे.'
जान्हवी हेदेखील म्हणाली...
- शोमध्ये जान्हवी म्हणाली, 'एकच ड्रेस परत परत घालण्यात मला कसलीही लाज वाटत नाही. माझ्या कपड्यांबद्दल चुकीच्या कमेंट्स करून मला ट्रोल केल्याने मला काहीही फरक पडत नाही. मी प्रत्येकाला आनंद तर नाही देऊ शकत, खासकरून कपड्यांच्याबाबतीत.'
- जान्हवी म्हणाली, 'माझ्या कामाबद्दल जर कुणी काही म्हणाले तर मी ते सीरियसली घेते. पण जिमच्या बाहेर लुक्स मेंटेन ठेवणे माझे काम नाही.' आई श्रीदेवीबद्दल जान्हवी म्हणाली, 'आई म्हणायची जास्त विचार करू नको, आपल्या कामाची जाणीव ठेव आणि पूर्ण मेहनत आणि ईमानदारीने काम करत राहा.'
धाकटी बहीण खुशीच्या फ्यूचरबद्दलदेखील बोलली जान्हवी...
जान्हवीने अशातच दिलेल्या एका इंटरव्यूमध्ये सांगितले की, तिची धाकटी बहीण खुशी हिला मॉडेलिंग करायचे होते पण आता तिला अभिनेत्री व्हायचे आहे. तिने सांगितले की, खुशी लवकरच न्यूयॉर्क फिल्म अकॅडमी जॉईन करणार आहे. तेथून परतल्यावर ती ठरवेल की, तिला काय करायचे आहे.
जान्हवीचे वर्कफ्रंट...
जान्हवी सध्या गुंजन सक्सेनाच्या बायोपिकचे शूटिंग करत आहे. याव्यतिरिक्त तिच्याकडे करण जोहरची फिल्म 'तख्त' देखील आहे. या फिल्ममध्ये तिच्यासोबत रणवीर सिंह, विक्की कौशल, आलिया भट्ट, करीना कपूर खान, भूमि पेडनेकर आणि अनिल कपूरदेखील आहे. जान्हवीने काही दिवसांपूर्वीच राजकुमार रावसोबत फिल्म 'रुहअफजा' साइन केली आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.