आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

द मॅन विथ डिफरन्स! 

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांच्या पाठोपाठ माजी केंद्रीय अर्थमंत्री पी. चिदंबरम यांनीदेखील गडकरींच्या स्पष्टवक्तेपणाचे गाेडवे अाळवण्यास सुरुवात केली अाहे. त्यांच्या मते, बंडखाेराने जे बाेलावे ते सगळेच, त्याशिवाय विराेधकांनी जे बाेलायला हवे तेदेखील गडकरी बाेलले अाहेत. म्हणूनच पक्ष पातळीवर गडकरी हे नरेंद्र माेदींना अाव्हान देऊ शकतात, अशीच व्यूहरचना त्यातून डाेकावते. 


'नेहरूंची भाषणे वाचायला किंवा एेकायला अापणास अावडतात, देशासाठी अापण जाचक ठरणार नाही असा विचार प्रत्येक नागरिकाने केला पाहिजे; असा विचार नेहरूंनी मांडला हाेता अाणि अापणही तसाच विचार करताे.' 
'तुम्ही केवळ उत्तम वक्ते अाहात म्हणून निवडणुकीत विजय मिळत नसताे.' 
'विजयाच्या श्रेयासाठी सारेच धडपडतात, पराजय मात्र अनाथ असताे. यशाचे श्रेय लाटण्यासाठी झुंबड उडते, परंतु अपयशाची जबाबदारी घ्यायला काेणी तयार हाेत नाही.' 
 'स्वप्न दाखवणारे साऱ्यांनाच अावडतात, जेव्हा ती पूर्ण हाेत नाहीत तेव्हा जनता नेत्यांना त्यांची जागा ही दाखवून देते.' 
 'कार्यकर्त्यांनी प्रारंभी अापल्या काैटुंबिक जबाबदाऱ्या पार पाडल्या पाहिजेत, जाे स्वत:चे घर सांभाळू शकत नाही त्याच्यासाठी देश सांभाळणे वाटते तितके साेपे नाही.' 
अ तिशय मार्मिक अाणि उद्बाेधक अशी ही सारी विधाने अाहेत, केंद्रीय भूपृष्ठ परिवहन मंत्री नितीन गडकरी यांची. यातून जशी भाजप अंतर्गत धुसफूस दिसते तशीच संघ परिवारातील अस्वस्थता अधाेरेखित हाेते. २०१४ मध्ये जेव्हा नरेंद्र माेदी भारतीय राजकारणाच्या राष्ट्रीय पटलावर प्रकटले त्या वेळी या देशाने अातापर्यंतचा सर्वाधिक सक्षम पंतप्रधान मिळवला असा समज पक्का झाला हाेता. या देशाच्या विकासाची दशा अाणि दिशा ते अामूलाग्र बदलून टाकतील, अशी तमाम भारतीयांची अपेक्षा हाेती. परंतु, लाेकप्रियतेचा फायदा माेदींनी चाहत्या भांडवलदारांच्या स्वार्थपूर्तीसाठी अधिक करवून घेतला. परिणामी, डाेईजड हाेत चाललेल्या माेदी-शहांविराेधात रा.स्व.संघ उघड भूमिका घेण्यास सरसावला, तसेच संकेत उपराेक्त साऱ्या विधानांतून मिळतात. रा.स्व. संघ केवळ विचार करताे. परंतु, या विचारांच्या अाधारावर काही लाेेक जे बाेलतात; त्याचाच त्याने विचार केलेला असताे. हे इथे लक्षात घेतले पाहिजे अाणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या विधानांतील तथ्य हेच अाहे. त्यांच्या विधानांवर सहज विचार केला तरी माेदी-शहा हेच टार्गेट दिसतात. बहुधा संघ परिवाराने अाता भाजपचा चेहरा बदलण्याची भूमिका घेतलेली दिसते. नितीन गडकरी भलेही भांडवलदारांचे समर्थक असाेत, परंतु माेदी-शहा यांच्या कह्यातील भांडवलशाहीच्या साऱ्या दुर्गुणांपासून मुक्त अशा स्वरूपाची त्यांची प्रतिमा घडवली जात अाहे. जनमानसावर तसा ठसा उमटवला जात अाहे. माेदी-शहा यांची विचारसरणी अाढ्यताखाेर, हुकूमशाही प्रवृत्तीची अाहे, त्या तुलनेत नितीन गडकरी अधिक विनयशील अाणि उद्यमशील मानसिकतेचे अाहेत, हे वेगळे सांगायला हवे का? 'विजयाच्या श्रेयासाठी सारेच धडपडतात, पराजय मात्र अनाथ असताे. यशाचे श्रेय लाटण्यासाठी झुंबड उडते. परंतु, अपयशाची जबाबदारी घ्यायला काेणी तयार हाेत नाही.' खरे तर हे विधान तसे नवे नाही. परंतु जी अचूक वेळ नितीन गडकरी यांनी साधली ती निश्चितच नवी ठरावी. याशिवाय 'स्वप्ने दाखवणारे साऱ्यांनाच अावडतात, जेव्हा ती पूर्ण हाेत नाहीत तेव्हा जनता नेत्यांना त्यांची जागा ही दाखवून देते.' या दाेन्ही विधानातून मध्य प्रदेश, राजस्थान अाणि छत्तीसगडमधील दारुण पराभवानंतर भाजपत खदखदणारा असंताेष स्पष्टपणे अभिव्यक्त हाेताे. 
काँग्रेसमुक्त भारताच्या वल्गना करणाऱ्या भाजपचा 'अजेय रथ' राेखला गेला. हे खरे असले तरी पक्षाला पुढे घेऊन जायचे असेल तर नेत्याने अपयशाची जबाबदारी घ्यायला काय हरकत अाहे? नेत्याने जर अशी जबाबदारी घेतली तरच त्या अनुषंगाने अात्मपरीक्षण करणे शक्य हाेऊ शकते. अापल्या उणिवा भरून काढण्याचे उपाय याेजता येऊ शकतात. 'विजयाच्या श्रेयासाठी झुंबड उडते, पराजय मात्र अनाथ असताे' हे राजकारणातील कटू सत्य नितीन गडकरी यांनी लक्षात अाणून दिले. मात्र, त्या मागचा हेतू पक्षनेते-श्रेष्ठी समजून घेतील का? हा खरा प्रश्न अाहे. याशिवाय 'खासदार-अामदारांची कामगिरी चांगली नसेल तर त्याचे पालकत्व पक्षाध्यक्षांकडे येते' हा गडकरींचा टाेलादेखील मार्गदर्शक ठरावा... कारण, भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाचा स्वानुभव त्यांच्या गाठीशी अाहे. त्यामुळे त्यातील गांभीर्य समजून घेतले गेले पाहिजे. 
पंतप्रधान नरेंद्र माेदी हे फर्डे वक्ते अाहेत. अापला मुद्दा अगदी बेमालूमपणे गळी उतरवतात, हे तितकेच खरे. मात्र, बाेलबच्चन असून जमत नाही, तर त्याला कृतिशीलतेची जाेड द्यावी लागते. 'तुम्ही केवळ उत्तम वक्ते अाहात म्हणून निवडणुकीत विजय मिळत नाही' या विधानातील अंगुलीनिर्देश बरेच काही सांगून जाताे. नरेंद्र माेदी यांनी पंतप्रधान नेहरूंना अनेकदा लक्ष्य केले. नेहरूंची धाेरणे कशी चुकीची हाेती, त्यांनी सरदार पटेल यांच्यावर कसा अन्याय केला यावर ते सतत बाेलत असतात. या पार्श्वभूमीवर 'नेहरूंची भाषणे वाचायला किंवा एेकायला अापणास अावडतात, देशासाठी अापण जाचक ठरणार नाही, असा विचार प्रत्येक नागरिकाने केला पाहिजे; असा विचार नेहरूंनी मांडला हाेता अाणि अापणही तसाच विचार करताे.' हे नितीन गडकरी यांचे विधान स्वपक्षीयांंसाठी धक्कादायक ठरले नसेल तरच नवल. देशासाठी अापण जाचक ठरणार नाही, याचा प्रत्येक नागरिकाने विचार केला पाहिजे, हा नेहरू विचार मांडताना, विराेधी विचारसरणीच्या मंडळींविषयी विनयशीलता, उदारमतवादी भूमिका बाळगावी हेच गडकरींनी अधाेरेखित केले. अलीकडेच अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या कार्यक्रमात नितीन गडकरी म्हणाले, 'पक्ष कार्यकर्त्यांनी प्रारंभी अापल्या काैटुंबिक जबाबदाऱ्या पार पाडल्या पाहिजेत, जाे स्वत:चे घर सांभाळू शकत नाही त्याच्यासाठी देश सांभाळणे वाटते तितके साेपे नाही.' हे विधान भाजपपेक्षाही काँग्रेसच्या नेत्यांनी विशेेषत: पक्षाध्यक्ष राहुल गांधी यांनी फार मनावर घेतले अाणि या सुस्पष्ट वक्तव्याबद्दल गडकरींना ट्विटरद्वारे शुभेच्छा दिल्या. तसेच 'खरे तेच बाेलण्याचे धाडस अंगी असणारे भाजपतील अापणच एकमेव नेते अाहात, कृपया रफाल अाणि शेतकऱ्यांच्या दुर्दशेबद्दलदेखील काही बाेला', अशी पाेस्ट राहुल गांधी यांनी टाकली. मात्र, गडकरींनी यथेच्छ खरडपट्टी काढली, 'मला अाश्चर्य या गाेष्टीचे वाटते की, राहुल गांधींना मराठी कधीपासून कळायला लागले? अामच्या सरकारवर टीका करण्यासाठी तुम्हाला मीडियाने ट्विस्ट केलेल्या पाेस्टचा अाधार घ्यावा लागताे, हेच अामच्या सरकारचे अाणि माेदींचे यश अाहे. माझ्यातील अंगभूत धाडस सिद्ध करण्यासाठी अापल्या प्रशस्तिपत्राची गरज नाही. काँग्रेस अाणि भाजपच्या 'डीएनए'मध्ये नेमका हाच फरक अाहे.' मात्र, हा विषय इथेच थांबला नाही, अाता माजी केंद्रीय अर्थमंत्री पी. चिदंबरम यांनीदेखील गडकरींच्या स्पष्टवक्तेपणाचे गाेडवे अाळवण्यास सुरुवात केली अाहे. त्यांच्या मते, बंडखाेराने जे बाेलावे ते सगळेच, त्याशिवाय विराेधकांनी जे बाेलायला हवे तेदेखील गडकरी बाेलले अाहेत. म्हणूनच पक्ष पातळीवर गडकरी हे नरेंद्र माेदींना अाव्हान देऊ शकतात, अशीच व्यूहरचना त्यातून डाेकावते. उत्तर प्रदेश, राजस्थान, छत्तीसगड, मध्य प्रदेशातील १३५ जागा भाजपने २०१४ च्या लाेकसभा निवडणुकीत पटकावल्या; परंतु अाता किमान ८० जागा हातून निसटण्याची चिन्हे अाहेत, जर असे झाले तर गडकरींसाठी ती माेठी संधी ठरेल, हे निश्चित. पी. चिदंबरम यांचे निरीक्षण एकूणच या पार्श्वभूमीवर पुरेसे बाेलके ठरते. 
महाराष्ट्रातील मंत्रिपद, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्षपद असाे की, सध्याचे केंद्रीय भूपृष्ठ परिवहन मंत्रिपद असाे, या साऱ्याच पदांवर त्यांनी अमीट अशी 'गडकरी माेहाेर' उमटवली अाहे. माेदी सरकारच्या साडेचार वर्षांच्या कारकीर्दीतील रचनात्मक कार्याविषयी मंत्र्यांची क्रमवारी लावायची ठरले तर साहजिकच नितीन गडकरींना अग्रक्रमाने प्राधान्य द्यावे लागेल. वास्तवाची जाण ठेवून, धाडसी निर्णय कसे घ्यायचे अाणि न डगमगता कसे प्रत्यक्षात राबवायचे हे त्यांनी अनेकदा दाखवून दिले. 'पार्टी विथ डिफरन्स'च्या परिभाषेत 'मॅन विथ डिफरन्स' असा उल्लेख नितीन गडकरींच्या संदर्भात केला तर असंयुक्तिक ठरणार नाही. नितीन गडकरींचे व्यक्तित्व अजातशत्रू अाहे; ते संघ परिवाराचे निकटवर्ती अाहेत. कदाचित, या वर्षीच्या सार्वत्रिक निवडणुकीनंतर अल्पमतातील भाजपचे सरकार स्थापण्याची वेळ अाली अाणि पहिला मराठी पंतप्रधान हाेण्याची संधी नितीन गडकरींकडे चालून गेली तर अाश्चर्य वाटायला नकाे!! 

बातम्या आणखी आहेत...