आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

मोरगाव : साडेतीन गणेश पीठांपैकी श्रीगणेशाचे आद्यपीठ श्री मयूरेश्वर

एका वर्षापूर्वीलेखक: रिलिजन डेस्क
  • कॉपी लिंक

श्री गणेशाचे महाराष्ट्रातील साडेतीन गणेश पीठांपैकी हे आद्यपीठ होय. हे क्षेत्र भूस्वानंद भुवन म्हणून ओळखले जाते. चिंचवड येेथील गणेश उपासक मोरया गोसावी यांचे हे जन्मस्थान आहे. येथे कऱ्हा नदीच्या पात्रात त्यांना गणेशमूर्ती सापडली. त्यांनी त्या मूर्तीची चिंचवड येथे प्रतिष्ठापना केली. सर्व आरत्यांचा प्रारंभ होणाऱ्या 'सुखकर्ता दुख:हर्ता वार्ता विघ्नाची' ही आरती श्री समर्थ रामदास स्वामींनी येथे उत्स्फूर्तपणे रचली होती. 

आख्यायिका : या स्थानाचे माहात्म्य मुद्गल पुराणातील सहाव्या खंडात समाविष्ट आहे. भृशुंडी ऋषींच्या सांगण्यानुसार ब्रह्मा, विष्णू, महेश, शक्ती व सूर्य या पाच देवतांनी येथे अनुष्ठान करून गणेश पीठाची स्थापना केली. या स्थानी श्री गणेशाने मोरावर बसून सिंधू व कमलासुर देत्यांचा संहार केला. या युद्धात गणेशाचे मोर हे वाहन होते त्यावरून येथे गणेशास मयूरेश्वर किंवा मोरेश्वर या नावाने संबोधण्यात आले. येथील मंदिराची उभारणी ब्रह्मदेवाने केली. मंदिराच्या प्रवेशद्वारावरील श्लेाकात ब्रह्मदेवाचा उल्लेख आहे. मयूरेश्वराची मूर्ती शेंदूरचर्चित असून डाव्या सोंडेची आहे. 

जवळची ठिकाणे : जेजुरी खंडोबा, लवथळेश्वर येथील शिवमंदिर, सासवड सोपानदेव समाधी, बाेपगाव कानिफनाथ मंदिर, पुरंदर किल्ला, साकुर्डे मंदिर. 

0