आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

श्री सिद्धिविनायक न्यासाकडून पुलवामा शहीदांच्या कुटुंबियांसाठी 51 लाख रुपयांची मदत, मुख्यमंत्र्यांच्या हस्ते धनादेश सुपूर्द

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • 40 जवानांच्या कुटुंबियांना प्रत्येकी 1 लाख 27 हजार पाचशे रुपयांची मदत करण्यात आली

मुंबई- प्रभादेवी येथील श्री सिद्धिविनायक गणपती मंदिर न्यासाकडून पुलवामा हल्ल्यातील शहीदांच्या कुटुंबियांच्या सहायतेसाठी 51 लाख रुपयांचा निधी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते केंद्रीय राखीव पोलिस दलास - (सीआरपीएफ)  सुपूर्द करण्यात आला.
 

या निधीतून शहीद 40 जवानांच्या कुटुंबियांना प्रत्येकी 1 लाख 27 हजार पाचशे रुपयांची मदत करण्यात येणार आहे. मुख्यमंत्री श्री. ठाकरे यांच्या हस्ते निधीचे धनादेश सीआरपीएफचे पोलिस महानिरीक्षक संजय लाटकर, डेप्युटी कमांडर अनिमेष महिंद्रा यांच्याकडे सुपूर्द करण्यात आले. यावेळी श्री सिद्धिविनायक गणपती मंदिर न्यासाचे अध्यक्ष आदेश बांदेकर, कोषाध्यक्ष सुमंत घैसास, विश्वस्त भरत परीख, महेश मुदलीयार, आनंद राव, गोपाळ दळवी, संजय सावंत आदींसह न्यासाच्या कार्यकारी अधिकारी श्रीमती प्रियांका छापवाले आदी उपस्थित होते.