आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

श्री तुळजाभवानी देवीची शेषशायी अलंकार महापूजा

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

तुळजापूर - शारदीय नवरात्र महोत्सवात शुक्रवारी सहाव्या दिवशी श्री तुळजाभवानी देवीची शेषशायी अलंकार महापूजा मांडण्यात आली. श्री तुळजाभवानी देवीचे हे रूप पाहण्यासाठी व दर्शनासाठी भाविकांनी मोठ्या संख्येने गर्दी केली होती.  श्री तुळजाभवानीची शुक्रवारी नित्योपचार पूजा आणि अभिषेक पूजेनंतर शेषशायी अलंकार महापूजा मांडण्यात आली. या दिवसाचे महत्त्व भगवान विष्णू क्षीरसागरामध्ये शेष शय्यावरती विश्राम घेत असताना मातेने यांचे नेत्र कमलात जाऊन विश्राम घेतला. या वेळी भगवान विष्णू यांच्या दोन्ही कानातून निघालेल्या मलापासून (मळ) दोन दैत्य उत्पन्न झाले. त्यांची नावे शुंभ व निशुंभ आहेत. ते उत्पन्न होताच शेष शय्यावरील विष्णूवरती आक्रमण करण्यास जाऊ लागले. त्यावेळी नाभी कमलात विराजमान असलेल्या ब्रम्हदेव यांनी विष्णूच्या नेत्र कमलात विश्राम घेणाऱ्या देवीची स्तुती करून श्रीस जागवले व विष्णुवरती आक्रमण करणाऱ्या दैत्यांचा वध श्री तुळजाभवानी मातेने केला म्हणून विष्णूने आपले शेषशय्या विश्राम करण्यासाठी दिले. त्यामुळे ही शेषशायी अलंकार महापूजा मांडण्यात येते. अशी आख्यायिका सांगितली जाते. 

आज तलवार महापूजा : शनिवारी (दि.५) देवीची भवानी तलवार अलंकार महापूजा मांडण्यात येणार आहे तर रविवारी महिषासुरमर्दिनी अलंकार महापूजा होणार आहे.