Home | Jeevan Mantra | Disha Jeevanachi | shrimadbhagwat geeta tips for happy life

हे 4 साधे-सोपे काम करणाऱ्या व्यक्तीला कधीही जावे लागत नाही नरकात, नेहमी राहतो सुखी

रिलिजन डेस्क | Update - Nov 08, 2018, 12:01 AM IST

कळत-नकळतपणे तुमच्या हातून पाप घडल्यास, करा हे 4 सोपे उपाय

 • shrimadbhagwat geeta tips for happy life

  श्रीमद्भगवतः मध्ये स्वतः कृष्ण देवाने काही उपदेश केले आहेत. यामध्ये सांगितलेल्या एका श्लोकानुसार, जो मनुष्य हे 4 सोपे काम करतो. त्याला निश्चित स्वर्ग प्राप्ति होते. अशा मनुष्याने कळत-नकळत केलेले पाप कर्म माफ होतात आणि त्याला नरकात जावे लागत नाही. यामुळे प्रत्येकाने ही 4 कामे अवश्य केली पाहिजे.


  श्लोक
  दानेन तपसा चैव सत्येन च दमेन च।
  ये धर्ममनुवर्तन्ते ते नराः स्वर्गामिनः।।


  1. दान
  दान करण्याला हिंदू धर्मात खुप पुण्याचे काम मानले जाते. अनेक ग्रंथांत दान करण्याच्या महत्त्वाविषयी सांगितले आहेत. श्रीमद्भगवतः नुसार जो मनुष्य गरजु लोकांना नियमित दान करतो त्याला पुण्य प्राप्ति होते. मनुष्याने कधीच आपल्या दानाचा हिशोब ठेवू नये. गुप्त पध्दतीने दान केले पाहिजे. दान केल्याचा दिखावा करु नये. जो दान संबंधीत या गोष्टींना लक्षात ठेवतो त्याचे सर्व पाप कर्म मिटतात आणि त्याला स्वर्ग प्राप्ती होते.


  2. मनाला नियंत्रणात ठेवणे
  मनुष्याचे मन खुप चंचल असते. मन प्रत्येक वेळी भटकत राहते. ज्या मनुष्याचे मन नियंत्रणात नसते तो खुप जास्त महत्त्वाकांक्षी असतो. असा मनुष्य आपल्या इच्छा पुर्ण करण्यासाठी कोणतेही चुकीची कामे करु शकतो. त्याला आपल्या पाप कर्मामुळे नर्कात जावे लागते. यामुळे स्वर्गाची इच्छा ठेवणा-यांना आपल्या मनाला नियंत्रणात ठेवणे खुप आवश्यक आहे.


  इतर 2 गोष्टी जाणुन घेण्यासाठी पुढील स्लाईडवर क्लिक करा....

 • shrimadbhagwat geeta tips for happy life

  3. नेहमी खरे बोलणे
  खरे बोलणे मनुष्याच्या सर्वात खास गुणांपैकी एक आहे. ज्या मनुष्यात खरे बोलण्याचा गुण असतो त्याला प्रत्येक ठिकाणी यश मिळते. खोटे बोलणा-या किंवा खोट्याची साथ देणा-या माणसाला पापाचे भागीदार मानले जाते आणि त्याला नर्क यातना झेलाव्या लागतात. यामुळे, प्रत्येकाला खरे बोलणे आणि प्रत्येक परिस्थितीत ख-याची साथ देण्याचा गुण अवलंबवला पाहिजे.

 • shrimadbhagwat geeta tips for happy life

  4. तपस्या
  तप आणि देवाचे ध्याने करण प्रत्येकासाठी आवश्यक मानले जाते. अनेक लोक आपल्या व्यस्त जीवनामुळे देवाचे ध्यान करत नाही. अशा मनुष्यावर देवी-देवता नेहमी रुष्ठ राहतात. नियमित थोडा वेळ देवाच्या तपासाठी आणि ध्यानासाठी दिल्याने मनुष्याच्या सर्व अडचणी दूर होतात आणि त्याला स्वर्ग प्राप्ति होते.

Trending