आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रासंगिक:अायर्न लेडी मेरी काेम

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

‘देशाला सुवर्णपदकाशिवाय देण्यासारखे माझ्याकडे काही नाही. टाेकियाे अाॅलिम्पिकमध्ये मला सुवर्ण जिंकणे साेपे नसेल. कारण ५१ किलाे वजनी गटात लढायचे अाहे,’ या अाश्वासक अात्मविश्वासातच मेरी काेमच्या यशाचे रहस्य दडले अाहे. युक्रेनच्या हॅना अाेखाेतावर ५-० असा निर्भेळ विजय मिळवून जागतिक स्पर्धेतील सहाव्या सुवर्णपदकावर तिने माेहाेर उमटवली अाणि इतिहास घडवला.

 

जागतिक स्पर्धेत सहा सुवर्णपदके पटकावणारी ती पहिलीच महिला बाॅक्सर ठरली. मेरीने अंतिम स्पर्धेत धडक मारली तेव्हाच ती सुवर्णपदक पटकावल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही, याची चाहूल लागली हाेती. अपेक्षेप्रमाणे फारसा संघर्ष न करता तिने अायबा जागतिक महिला बाॅक्सिंग स्पर्धेत सुवर्ण पटकावले. अाता तिच्या खात्यावर ६ सुवर्ण अाणि ७ राैप्यपदके जमा झाली अाहेत. तिने पुरुष बाॅक्सिंगमधील फेलिक्स सॅव्हनच्या जागतिक स्पर्धेतील सहा सुवर्णपदकांशी बराेबरी केल्याने महिला तसेच पुरुषांमधील सर्वाधिक यशस्वी बाॅक्सरमध्ये मेरीची गणना हाेत अाहे. मेरी कोमने पाच वेळा जागतिक स्पर्धेचे सुवर्णपदक जिंकले, २००२ मध्ये अंताल्या, २००५ पोडोल्स्क, २००६ नवी दिल्ली, २००८ निंग्बो सिटी आणि २०१० मध्ये ब्रिजटाऊन येथे सोनेरी यश मिळवले. त्याचप्रमाणे २००१ मध्ये स्क्रांटनमधील स्पर्धेत पहिले रौप्यपदक पटकावले होते. 


मेरी काेमच्या यशाचे रहस्य तिच्या शिस्तप्रियतेत अाहे, असे म्हटले तर वावगे ठरू नये. ती जर सकाळी दिल्लीतील राष्ट्रीय शिबिरात प्रशिक्षण घेत असेल तर तेथूनच थेट संसद भवनाकडे निघते, जेणेकरून राज्यसभा सदस्य या नात्याने ती कामकाजात सहभागी हाेऊ शकेल अाणि तिच्या नावासमाेर गैरहजेरीचा शेरा लागणार नाही, याची ती काळजी घेते. बाॅक्सिंगच्या रिंगमध्ये ती जेवढी संघर्षप्रिय दिसते, त्यापेक्षाही अधिक कठीण संघर्ष करताना वैयक्तिक जीवनात ती डगमगली नाही, म्हणूनच बाॅक्सिंगमधील अायर्न लेडी ही उपाधी तिला सार्थ ठरते. पाच वेळा विश्व चॅम्पियन ठरलेली मेरी काेम बाॅक्सिंगमधील अाॅलिम्पिक पदक जिंकणारी पहिला भारतीय महिला ठरली. २०१२ च्या लंडन अाॅलिम्पिकमध्ये तिने कांस्यपदक पटकावले हाेते. 


मणिपूरमधील कांगथेई या दुर्गम खेड्यातील एका अतिशय गरीब कुटुंबात मेरी कोमचा जन्म झाला. मुलांना शिकवण्याइतकीही आई-वडिलांची परिस्थिती नव्हती. बँकॉकच्या आशियाई स्पर्धांमध्ये मणिपुरी बॉक्सर डिंको सिंग यांनी सुवर्णपदक पटकावल्याचे तिला कळले अाणि आपणही बॉक्सिंगच्या रिंगमध्ये का उतरू नये, या प्रश्नाने तिच्या मनात घर केले. कुटुंबीयांचा विरोध पत्करून २००० मध्ये १७ व्या वर्षी मेरी कोमने बॉक्सिंग रिंगमध्ये पहिले पाऊल टाकले. दोन आठवड्यांत ती बॉक्सिंगच्या पायाभूत बाबी शिकली अन् २००० सालीच तिने राज्यस्तरीय स्पर्धेचे जेतेपद पटकावले. वर्तमानपत्रात नाव-फोटो झळकले आणि घरी मेरी कोमच्या यशाची कल्पना कुटुंबीयांना आली. बॉक्सिंगबद्दल मेरी कोमची ओढ पाहून त्यांचा विरोधही मावळला.

 

सातव्या ईस्ट इंडिया महिला बॉक्सिंग स्पर्धेत मेरी कोमने सुवर्ण पटकावले आणि त्यानंतर पुढच्या पाच वर्षांत सर्व राष्ट्रीय स्पर्धांमध्ये उत्तम कामगिरी तिने बजावली. हिस्सार इथे झालेल्या दुसऱ्या आशियाई महिला बॉक्सिंग स्पर्धेत आंतरराष्ट्रीय स्तरावरच्या पहिल्या सुवर्णपदकावर मेरी कोमने स्वत:चे नाव कोरले. तैवानमध्ये तिने विजयाची पुनरावृत्ती केली आणि मग तिचा जागतिक स्पर्धेतील विजेतेपदांचा सिलसिला सुरू झाला. 


अर्थात, अमेरिकेतील पहिल्या जागतिक मुष्टियुद्ध स्पर्धेत तिला रौप्यपदकावर समाधान मानावे लागले. पण बहुधा त्यातच पुढच्या यशाचे गमक दडले होते. २००३ मध्ये तिला अर्जुन पुरस्कार प्रदान करण्यात आला. प्रतिस्पर्ध्याला रिंगमध्ये जास्तीत जास्त पळवून त्याची दमछाक करणे हे तिचे तंत्र आहे. प्रत्येक वेळी परिस्थितीवर मात करीत ताठ उभी राहणारी मेरी काेम बाॅक्सिंगच्या रिंगमध्ये निराळ्या रूपात अापल्यासमाेर येते. खासदार, बाॅक्सिंग अकादमीची मालक, शासकीय क्रीडा पर्यवेक्षक, अाई-पत्नी अशा अनेक भूमिका एकावेळी निभावणारी मेरी काेम म्हणते, रिंगमध्ये केवळ दाेघे बाॅक्सर असतात, जेव्हा अापण रिंगमध्ये प्रवेशताे तेव्हा प्रतिस्पर्ध्यासमाेर गर्जलाे नाही, तर अापण खरे बाॅक्सरच नव्हेत. यातूनच बाॅक्सिंगविषयी ती किती समर्पित अाहे याची कल्पना येते.

 

श्रीपाद सबनीस

बातम्या आणखी आहेत...