आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जळगावच्या श्रीराम रथाेत्सवात शिरले चाेरटे;150 पाेलिसांचा डाेळा चुकवून पाकिटांसह 24 माेबाइल, मंगळसूत्र लांबवले

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव- जळगाव नगरीचे ग्रामदैवत असलेल्या श्रीराम रथोत्सवात सहभागी झालेल्या भाविकांच्या खिशावर चोरट्यांनी डल्ला मारला. यात तब्बल २४ मोबाइल व चार पाकिटे, एक मंगळसूत्र आणि रोख ३० हजार रुपये ठेवलेली पर्स लंपास केली. १५० पोलिसांच्या बंदोबस्तातही चाेरट्यांनी सुमारे ३ लाख रुपयांचा ऐवज चोरून नेला आहे.


सोमवारी दुपारी १ वाजेपासून रथाचौकातून रथ सुरू झाला. यात लाखोंच्या संख्येने भाविक सहभागी झाले होते. याच गर्दीचा फायदा घेत चोरट्यांनी हातसफाई केली. रथ आंबेडकरनगर, चौधरीवाडा, भोईटेगढी, तेलीगल्ली, बोहरा गल्ली, दाणा बाजार, फळगल्ली, घाणेकर चौक, गांधी मार्केट, भिलपुरा मशीद, बालाजीपेठेतून पुन्हा रथचौकात आला. रात्री ११.४५ वाजता रथ मूळ जागेवर अाला. यादरम्यान, चोरट्यांनी भाविकांच्या खिशातून अलगदपणे मोबाइल काढले. भाविक उत्सवाच्या रंगात असताना चोरट्यांनी मात्र, चांगलीच संधी साधली होती.

 

तर रथोत्सवात अप्रिय घटनांवर नियंत्रण ठेवण्यासाठी सर्व पोलिस ठाण्याचे मिळून सुमारे १५० कर्मचारी, अधिकारी तैनात करण्यात आले होते. पोलिसांच्या नजरा चुकवत चोरट्यांनी आपला डाव साधला. शहर पोलिस ठाण्याच्या हद्दीतून ७ मोबाइल व दोन पाकिटे तर शनिपेठ पोलिस ठाण्याच्या हद्दीतून १७ मोबाइल लंपास केले. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने या गर्दीतून दोन मोबाइल चोरट्यांना अटक केली आहे. याशिवाय इतर चोरटे पोलिसांच्या हाती लागले नाहीत.

 

सराफा बाजारात महिलेच्या हातातील कापडी पिशवी कापून ३० हजार ५०० रुपयांची राेकड लंपास

शहर पोलिस ठाणे हद्दीतून महेश रामचंद्र कुळकर्णी (वय ५४, रा.शंकरअप्पानगर), संदीप धनराज सैंदाणे (वय १७, रा.येरवडा, पुणे), निखिल शरद पाटील (वय १९, रा.ममुराबाद), मयूर मधुकर पाटील (वय २०, रा.मू.जे.महाविद्यालय परिसर), अमोल भिकन देवरे (वय २३, रा.शिंदी, ता.भडगाव), नितीन रमेश नवले (वय ३७, रा.शिवाजीनगर), प्रकाश हरिश्चंद्र कोळी (रा.खडकेचाळ) यांचे मोबाइल तर जगदीश सुकदेव पाटील (रा.खोटेनगर) यांचे २ हजार १३० रुपये रोकड, कागदपत्रे असलेले पाकीट, दूध फेडरेशन परिसरातील रोहित सुनील पाटील यांचे पाकीट, रामानंद नगरातील शिवराम भागवत फेगडे यांचे पाकीट, वरणगावचे देवेंद्र सुनील वाघे यांचे रोकड असलेले पाकीट, डॉ.मयुरी मालो यांची ३ हजार रोकडची पर्स, नशिराबादच्या कल्पना केशब भंबाळे या पती व बहिणीसोबत बाजारात आल्या होत्या. त्या सराफ बाजारात फिरताना त्यांच्याजवळची कापडी पिशवी कापून ३० हजार ५०० रुपये रोख आणि १४०० रुपयांचा मोबाइल लंपास झाला. त्यांच्या फिर्यादीवरून शनिपेठ पोलिसांत गुन्हा दाखल झाला. खलील रहेमान शहा (रा.खंडेरावनगर), महेश मंगेश चौधरी (रा.समतानगर), रमेश काळू चौधरी (रा.नित्यानंदनगर), सुनील बाबुराव पाटील (रा.राधाकृष्णनगर), नीलेश सुनील शिंपी (रा.कांचननगर), करण सुनील चौधरी (रा.शिवाजीनगर), सागर अविनाश कुलकर्णी (रा.अयोध्यानगर), दीपक मोतीलाल सोनार (रा.ज्ञानदेवनगर), जुने जळगाव परिसरातून चोरट्यांनी निकिता प्रवीण पाटील (रा.इंद्रप्रस्थनगर), विनीत संजय तेजकर (रा.बळीराम पेठ), पंढरीनाथ पांडुरंग नेमाडे (रा.पिंप्राळा), भगवान पुंडलिक कोळी (रा.ज्ञानदेवनगर), भावलाल दिलीप सपकाळे (रा.करंज), उज्ज्वल अनिल नेवे, संदीप धनराज सैंदाणे (रा.पुणे), दिनेश गोकुळ झांजरे (रा.नाथवाडा), दुर्गादास आकाश सपकाळे (रा.हरिओमनगर), प्रफुल्ल गणेश कोळी (रा.अयोध्यानगर), जितेश मगन सपकाळे (रा.आवार), दीपक सुभाष कोळी यांचे मोबाइल लंपास केले.

 

पाच ग्रॅमच्या मंगळसूत्राची चाेरी
गर्दीचा फायदा घेत चोरट्यांनी दुपारच्या सुमारास कोळीपेठेत राहणाऱ्या शीतल प्रवीण बेहरे यांचे ५ ग्रॅम वजनाचे मंगळसूत्र लंपास केले. याप्रकरणी शनिपेठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

संशयावरून दोघांना अटक
गर्दीत चोरी उद्देशाने फिरताना मोहम्मद अब्राहम शेख इब्राहिम (वय २२, रा.उमिया माता मंदिर, मोचीवाडी, उधना, सुरत) व मोहन प्रकाश भारुळे (वय २०, रा. कोळीपेठ, जळगाव) या दोघांना शहर पोलिसांनी अटक केली. या दोघांकडून चावीचे गुच्छे व स्क्रू ड्रायव्हर मिळून आले. मंगळवारी त्यांना न्यायालयात हजर करण्यात आले. दोघांची जामिनावर मुक्तता करण्यात आली.

बातम्या आणखी आहेत...