Home | Jeevan Mantra | Disha Jeevanachi | shriramcharit manas tips for husband and wife

स्त्री तसेच मित्र आणि धैर्याची पारख करायची असल्यास लक्षात ठेवा एक नीती

रिलिजन डेस्क | Update - Dec 08, 2018, 12:03 AM IST

पत्नी चांगली असल्यास पतीला यशाच्या शिखरावर पोहोचवते, परंतु पत्नी चांगली नसल्यास राजालाही भिकार बनवू शकते, केव्हा होते पत

 • shriramcharit manas tips for husband and wife

  श्रीरामचरितमानसमध्ये गोवामी तुलसीदास यांनी श्रीराम कथेसोबतच सुखी आणि यशस्वी जीवनासाठी विविध नीती सांगितल्या आहेत. या नीतींचा आपण अवलंब केल्यास विविध अडचणींपासून दूर राहू शकतो. येथे जाणून घ्या, देवी सीता आणि माता अनुसूया यांच्या संवादानुसार आपण एखाद्या व्यक्तीची केव्हा पारख करू शकतो?


  माता अनुसूया देवी सीताला सांगतात की
  धीरज, धर्म, मित्र अरु नारी। आपद काल परखिए चारी।


  > या चौपाईमध्ये अनुसूया म्हणतात की, धीरज म्हणजे धैर्याची पारख अडचणींमध्ये होते, कारण विपरीत स्थितीमध्ये व्यक्ती क्रोधीत होतो आणि चूक करून बसतो.


  > धर्माची परीक्षाही वाईट काळातच होते. एखादा व्यक्ती अडचणीच्या काळातही खोटे वागत नाही, बोलत नाही आणि धर्माच्या मार्गावर चालत राहतो तोच श्रेष्ठ व्यक्ती असतो.


  > आपल्या जीवनात गरिबी, आजार आणि वाईट काळ सुरु होतो तेव्हा आपल्या मित्रांची पारख होते. अशा परिस्थितीमधून आपण मित्राच्या मदतीने बाहेर पडू शकतो. मित्रांच्या मदतीने लक्ष्य गाठू शकतो.


  > पत्नीची पारख तेव्हा होते जेव्हा पती संकटात अडकतो, त्याची धन-संपत्ती नष्ट होते, घर-कुटुंब आणि समाज पतीची साथ देत नाही. अशा परिस्थितीमध्ये पत्नीने पतीची साथ दिली तर अशी पत्नी श्रेष्ठ असते. पत्नी चांगली असल्या पतीला यशाच्या शिखरावर पोहोचवते परंतु पत्नी वाईट असल्यास राजालाही भिकारी बनवू शकते.

Trending