Home | Jeevan Mantra | Arogya/Ayurved | shruti sarda weight loss story

जुळ्या मुलांना जन्म दिल्यानंतर 30 वर्षीय श्रुतीचे वजन झाले होते 89 किलो. एक वर्ष वाट पाहूनही वजन कमी न झाल्याने स्वीकारला हा मार्ग आणि बदलला स्वतःचा लुक; 32 किलो वजन केले कमी

दिव्य मराठी वेब टीम | Update - Apr 08, 2019, 12:24 PM IST

संध्याकाळी 5.30 पूर्वीच करत होती जेवण, यासोबतच हे उपाय केल्यानंतर कमी झाले वजन

 • shruti sarda weight loss story


  हेल्थ डेस्क - प्रेग्नन्सीनंतर शरीरातील फॅट कमी करणे महिलांसाठी कठीण होऊन बसते. पण असे अनेक उदाहरणे आहेत की प्रेग्नन्सीनंतरही महिलांनी स्वतःला पहिल्यासारखे फीट ठेवले आहे. 30 वर्षीय श्रुतीची अशीच काहीशी गोष्ट आहे. जुळ्या मुलांना जन्म दिल्यानंतर त्यांचे वजन 89 किलोपर्यंत पोहोचले होते. फीट कपडे देखील ते परिधान करू शकत नव्हते. यानंतर त्यांनी निश्चय केला आणि 18 महिन्यांत 32 किलो वजन कमी केले. त्यांनी आपले वजन कमी करण्याचा संपूर्ण प्रवास मीडियासोबत शेअर केला आहे.


  एक वर्ष केली प्रतिक्षा

  - मुलांच्या जन्मानंतर असे वाटले की, प्रेग्नन्सीमध्ये वाढलेले वजन आपोआप कमी होईल. नैसर्गिकरित्या वजन कमी होण्याची त्यांनी वर्षभर वाट पाहिली. पण वजन कमी न झाल्यामुळे त्यांनी जिममध्ये जाऊन वजक कमी करण्याचा निश्चय केला.

  - श्रुती नाश्त्यामध्ये फक्त 2 पोळ्या आणि 1 वाटी भाजी खात होती. जेवणाचा आहार देखील हलका घेत असे. जास्त करून दोन-तीन प्रकारचे फळे आणि सुका मेवा खात होती.

  - संध्याकाळी 5.30 वाजेच्या अगोदर रात्रीचे जेवण करत होती. यात दोन पोळ्या किंवी ब्राउन ब्रेडचे सेवन करत होती. यासोबतच दाळ, सलाड आणि एक वाटी भाजीचा त्यात समावेश होता.

  पिझ्झा-पास्ताचा केला विरोधा

  - पिझ्झा आणि पास्ता खाणे श्रुतीला पसंत होते. पण ते रेग्युलर खाणे बंद केले. दोन-तीन आठवड्यातून फक्त एकदा खात होती.

  - आठवड्यातील 5 दिवस एक ते दीड तास वर्कआउट करत होती. स्ट्रेचिंगनंतर 20 मिनिटे कार्डियोसाठी देत होती. यानंतर वेट लिफ्टिंग, स्क्वॉट्स, कोर स्ट्रेंथिंग आणि पोटाच्या व्यायाम करण्यात भर होता. दररोज 30 मिनिटांचा वॉकचा ही या व्यायामात समावेश होता.


  जेवणात लपले आहे आरोग्याचे रहस्य

  - श्रुतीचे म्हणणे आहे की, तुम्ही जितके आरोग्यदायी जेवण करता तितक्याच चांगल्याप्रकारे तुम्हाला वर्कआउट करता येईल. श्रुती आपल्या आहारात प्रोटीन-रिच फूडचा वापर जास्त प्रमाणात करते.

  - वजन कमी करण्याचे वीडिओ आणि पुस्तकांचे वाचन करत स्वतःला प्रोत्साहित करते. ओव्हरवेट सर्वात मोठे नुकसान म्हणजे स्वतःचा आत्मविश्वास कमी होत असल्याचे श्रुतीचे म्हणणे आहे.

Trending