Home | Jeevan Mantra | Jyotish | Rashi Nidan | shubh sanket for bhagyoday news in marathi

घरामध्ये या गोष्टी घडू लागल्यास समजावे लवकरच होणार भाग्योदय

रिलिजन डेस्क | Update - Dec 01, 2018, 12:04 AM IST

कपडे घालताना खिशातून पैसे पडले तर हे तुमच्यासाठी आहे अत्यंत शुभ, वाचा भाग्योदयाचे असेच पाच संकेत...

 • shubh sanket for bhagyoday news in marathi

  अनेक लोकांसोबत असे घडते की, कपडे घालताना खिशातून पैसे पडतात. तसं पाहायला गेलं तर ही सामान्य घटना आहे. परंतु ज्योतिषच्या शकुन-अपशकुन शास्त्रामध्ये हे अत्यंत शुभ मानले जाते. शकुन शास्त्र ज्योतिषमधील एक सहायक ग्रंथ मानला जातो. परंतु ज्योतिषाचार्य प्रवीण के. त्रिवेदी यांच्यानुसार, आजकाल लोक या गोष्टींना अंधश्रद्धा मानतात परंतु आजही कुठे न कुजते या गोष्टींचे अस्तित्व आहे. या छोट्या-छोट्या घटना आपल्या भविष्याचा संकेत देतात. हे संकेत आपण समजून घेतल्यास आपल्यासोबत भविष्यात घडणाऱ्या घटनांचा आपण अंदाज बांधू शकतो. घरात किंवा घराजवळ अशा काही घटना घडतात, ज्यावरून आपण स्वतःला भविष्यासाठी तयार करू शकतो. असेच काही संकेत आज आम्ही तुम्हाला येथे सांगत आहोत.


  खिशातून नाणे खाली पडणे : कपडे घालताना खिशातून नाणे पडणे हा शुभ संकेत आहे. तुम्हाला भविष्यात धनलाभाची संधी मिळू शकते, यासाठी तयार राहावे.


  घरातील नारळ आपोआप तडकणे : घरामध्ये एखादे नारळ ठेवलेले असली आणि त्याला आपोआप तडा गेल्यास समजावे की, घरातील नकारात्मक ऊर्जा नारळाने शोषून घेतली आहे. तुम्हाला आता कोणतीही अडचण येणार नाही.


  घरामध्ये आपोआप तुळस उगवणे : तुमच्या घरातील बागेत आपोआप तुळशीचे रोप उगवले तर हा शुभ संकेत समजावा. घरामध्ये भगवान विष्णू आणि लक्ष्मीचा वास राहणार असल्याचे समजावे.


  पुढील स्लाईड्सवर जाणून घ्या, इतर दोन संकेत...

 • shubh sanket for bhagyoday news in marathi

  आपोआप दुर्वा उगवणे : घरातील बागेमध्ये दुर्वा (श्रीगणेशाला अर्पण करण्यात येणारे एक गवत) उगवल्यास समजावे की घरामध्ये आता कोणत्याही कामात अडथळे येणार नाहीत.

 • shubh sanket for bhagyoday news in marathi

  घरामध्ये मध पडणे : घरामध्ये मधाचे भांडे फुटून मध फरशीवर पसरल्यास समजावे की, घरामध्ये आता कोणतीही निगेटिव्ह एनर्जी राहिलेली नाही. घरामध्ये एखादे मंगलकार्य होऊ शकते.

Trending