आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एका पायावर डान्स करणा-या मुलीचा नवीन व्हिडिओ व्हायरल, डॉक्टरांच्या चुकीमुळे कापावा लागला होता पाय

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

एन्टटेन्मेंट डेस्क. जालंधर येथे राहणा-या शुभरीत कौरने सोशल मीडियावर आपला एक नवीन व्हिडिओ पोस्ट केला आहे. या मुलीला फक्त एक पाय आहे तरीही तिने डान्स करणे सोडलेला नाही. 'इंडियाज गॉट टॅलेंट'च्या माध्यमातून ती घराघरातील प्रेरणा स्त्रोत बनली होती. सलमान खानही तिला पाहून तिचा फॅन झाला होता. 


- 2009 मध्ये शुभरीतच्या स्कूटीचा अपघात झाला होता. डॉक्टरांच्या गैरजबाबदारपणामुळे तिचा पाय कापावा लागला होता. पण हिंमत पायांमध्ये नाही तर मनात असते हे म्हणतात ते खरे आहे. शुभरीतने हार मानली नाही आणि चंडीगढच्या एका डान्स अकॅडमीमध्ये डान्स शिकत राहिली. पण या अपघातानंतर तिला एक वर्ष अंथरुणात राहावे लागले होते. 


- पण नंतर ती पुन्हा उठली, नवीन उत्साहाने तिने डान्स सुरु केला. आता ती संपुर्ण देशात प्रसिध्द झाली आहे. तिचा नवीन व्हिडिओ सर्व काही शक्य आहे ही प्रेरणा लोकांना देतो. 
- शुभरीत मानते की, "परिस्थिती जी काही असेल पण माझे पॅशन कमी झाले नाही."

बातम्या आणखी आहेत...