आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चुकूनही करू नये हे 4 काम, कुटुंबावरही पडू शकतो याचा वाईट प्रभाव

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

हिंदू धर्म ग्रंथांमध्ये मनुष्याने करू नयेत अशा अनेक कामांविषयी सांगण्यात आले आहे. ही कामे केल्यास न केवळ त्यांचे स्वतःचे तर संपूर्ण कुटुंबाचे अहित होऊ शकते. दैत्यांचे गुरु शुक्राचार्य यांनी शुक्रनीतीमध्ये 4 अशाच कामांविषयी सांगितले आहे. येथे जाणून घ्या, मनुष्याने कोणत्या चार कामांपासून दूर राहावे...


श्लोक-
अनृतात् पारदार्याच्च तथाभक्ष्यस्य भक्षणात्।
अगोत्रधर्माचरणात् क्षिप्रं नश्यति वै कुलम्।।


1. खोटं बोलणे
अनेक लोकांना खोट बोलण्याची सवय असते. त्यांना त्यांची ही सवय फार सामान्य वाटते, परंतु हीच सवय त्यांना नष्ट करू शकते. खोट बोलल्याने न केवळ स्वतःला तर कुटुंबातील सदस्यांनाही दुःख आणि अडचणींना सामोरे जावे लागते. या सवयीपासून जेवढे दूर राहाल तेवढेच चांगले राहील.


2. कुटुंबाच्या परंपराविरुद्ध काम करणे
अनेक लोक घरातील वडीलधारी मंडळींचा मान-सन्मान ठेवत नाहीत, तसेच त्यांनी सांगितलेल्या घराच्या परंपरांचे पालन करत नाहीत. असे लोक आपल्या कुलाच्या विनाशाचे कारण ठरतात. जो मनुष्य घराच्या नियम आणि परंपरांचा सन्मान करत नाही, त्याला विविध प्रकारच्या दुःख आणि अडचणींना सामोरे जावे लागते.


3. परस्त्री सोबत संबंध ठेवणे
परस्त्रीकडे वाईट दृष्टीने पाहणे किंवा तिच्याशी संबंध प्रस्थापित करणे महापाप मानले जाते. जो व्यक्ती इतर कोणत्याही स्त्रीसोबत संबंध ठेवतो किंवा तिचा विचार करतो तो राक्षस प्रवृत्तीचा मानला जातो आणि त्याला नरकात विविध प्रकारच्या यातना सहन कराव्या लागतात. हे पाप कर्म कोणत्याही कुटुंबाला नष्ट करू शकते.


4. मांसाहारी असणे
जीवांची हत्या करणे किंवा त्यांचे सेवन करण्यास मनाई केली जाते. असे करणाऱ्या मनुष्याला देवाची कृपा प्राप्त होत नाही तसेच त्याच्या पूजा-उपासनेचे फळही प्राप्त होत नाही. अशा लोकांना प्रत्येक वेळी कोणत्या न कोणत्या प्रकारच्या अडचणीला सामोरे जावे लागते. शुक्रनीतीनुसार ही सवय कोणत्याही कुटुंबाचा नाश करू शकते, यामुळे यापासून दूर राहावे.

बातम्या आणखी आहेत...