आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Koffee With Karan: Shweta Bachchan Revealed Why Her Mother Jaya Bachchan Hates Paparazzi

या एका आजारामुळे फोटोग्राफर्सवर नेहमी नाराज होतात जया बच्चन, लेक श्वेताने केला खुलासा 

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई. अभिषेक बच्चन आणि श्वेता बच्चन रविवारी रात्री करण जोहरचा चॅट शो 'कॉफी विद करण'मध्ये पोहोचले. यादरम्यान त्यांनी आपल्या पर्सनल लाइफविषयी अनेक गोष्टी शेअर केल्या. विशेष म्हणजे येथे श्वेताने आपल्या आईविषयी एक गोष्ट सांगितली. आपल्या आई जया बच्चनला फोटोग्राफरचा राग का येतो याचे कारण तिने सांगितले. श्वेता म्हणाली की, ती एका आजारामुळे असे वागते. 


जास्त लोकांना पाहून क्लॉसट्रोफोबिक होतात जया 
- श्वेताने बोलताना सांगितले की, "आई जेव्हा आजुबाजूला जास्त लोकांना पाहते तेव्हा ती खुप क्लॉसट्रोफोबिक होते. लोकांनी परवाणगी न घेता तिचे फोटो घेतलेले तिला अजिबात आवडत नाही. तिचे विचार असेच आहेत."
-क्लॉसट्रोफोबिक( Claustrophobic क्लॉसट्रोफोबिया (claustrophobia) पासून बनले आहे. हे एकप्रकारचे एंजाइटी डिसऑर्डर आहे. हा अजार असणा-या व्यक्तीला गर्दीच्या ठिकाणी उभे राहावे वाटत नाही. असे लोक गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळतात.

 

फॅमिली व्हॉट्सअप ग्रुपवर सर्वात जास्त अॅक्टिव्ह असतात जया 
- करणने अभिषेक आणि श्वेताला विचारले की, फॅमिली व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सर्वात जास्त अॅक्टिव्ह कोण राहते, तेव्हा त्यांनी सांगितले की, आई सर्वात जास्त अॅक्टिव्ह आई असते आणि सर्वात कमी अॅक्टिव्ह वडील अमिताभ बच्चन असतात.

बातम्या आणखी आहेत...