आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Shweta Basu Prasad Shared On Social Media 3 Days Before First Wedding Anniversary, Will Divorce With Rohit Mittal

वर्षभरही टिकले नाही श्वेता बसु प्रसादचे लग्न, नव-यापासून घेणार घटस्फोट, सोशल मीडियावर शेअर केली पोस्ट

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बॉलिवूड डेस्कः 'चंद्रनंदिनी' आणि 'द ताशकंद फाइल्स' या टीव्ही शोमध्ये झळकलेली अभिनेत्री श्वेता बसू प्रसादने इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर करुन नवरा रोहित मित्तलपासून विभक्त होत असल्याची बातमी दिली आहे. श्वेता आणि रोहित यांचा संसार वर्षभरही टिकला नाही. गेल्यावर्षी 13 डिसेंबर रोजी बंगाली पद्धतीने दोघांनी लग्न केले होते. लग्नाच्या पहिल्या वाढदिवसाच्या तीन दिवसांपूर्वी श्वेताने सोशल मीडियावर पोस्ट करुन फॅन्सला धक्का दिला. 

  • सामंजस्याने होत आहेत विभक्त...

श्वेताने सोशल मीडियावर लिहिलेल्या  पोस्टमध्ये म्हटले, "हॅलो, रोहित मित्तल आणि मी दोघांनीही परस्पर सहमतीने विभक्त होण्याचा निर्णय घेतला आहे. अनेक महिन्यानंतर एकमेकांच्या भल्यासाठी आम्ही या निर्णयापर्यंत पोहोचलो आहोत. सर्व पुस्तके केवळ मुखपृष्ठावरुन वाचावीत, अशी नसतात. याचा अर्थ हा नाही की ती पुस्तके वाईट असतात. पण काही गोष्टी अर्धवटच सोडलेल्या ब-या. मला एवढे अविस्मरणीय क्षण दिल्याबद्दल आणि मला कायम प्रेरित केल्याबद्दल रोहित तुला धन्यवाद. तुला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा.. तुझीच चिअरलीडर."

  • चार वर्षे होते रिलेशनशिपमध्ये...

लग्नापूर्वी हे दोघे चार वर्षे रिलेशनशिपमध्ये होते.  'फॅन्टम फिल्म्स' या प्रॉडक्शन कंपनीमध्ये स्क्रिप्ट रायटर म्हणून काम करत असताना रोहितसोबत श्वेताची भेट झाली होती.  दोघे लिव्ह इनमध्ये राहिले आणि 2017 मध्ये त्यांनी साखरपुडा केला होता. त्यानंतर 13 डिसेंबर 2018 रोजी पुण्यात लग्न केले होते.    

बातम्या आणखी आहेत...