आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'मिर्जापुर-2' साठी श्वेता त्रिपाठीने कापले केस, अनोख्या अंदाजात दिसली 'गोलू गुप्ता'

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • भूमिकेची गरज होती म्हणून केस कापले- श्वेता

बॉलिवूड डेस्क- नुकताच 'मिर्जापुर-2'चा पहिला लूक प्रदर्शित झाला आहे. यात श्वेता त्रिपाठी पहिल्या सीझनपेक्षा या सीझनमध्ये वेगळ्या शैलीत दिसणार आहे. श्वेता दुसऱ्या सीझनमध्येदेखील गोलू गुप्ताची भूमिका साकारताना दिसणार आहे. मात्र यात तिचे केस छोटे दिसणार आहेत. 


शोमध्ये तिचचा लूक आक्रामक दिसत आहे, शिक्षण सोडून हातात बंदूक घेतेय की काय अशी दिसत आहे. यााविषयी श्वेता संागते..., गोलू गुप्ताच्या पात्रासाठी मी मेकअप करत नव्हते. फक्त सनस्क्रीन लावून सेटवर जात होते. 'मिर्जापुर-2' साठी मी केस कापले, कारण ती भूमिकेची गरज होती. यासाठी मी आधी तयार नव्हते कारण केस कापल्यामुळे माझ्या इतर प्रोजेक्टवर परिणाम झाला असता. विग घालून काम करण्यासाठी मागेपुढे चालले होते मात्र दिग्दर्शकावर विश्वास ठेवत मी केप कापले. माझे चांगले दाट केस होते मात्र पात्र जीवंत करण्यासाठी मी केस कापण्याचा निर्णय घेतला.

बातम्या आणखी आहेत...