आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराएंटरटेनमेंट डेस्क - कुठल्याही प्रकारच्या सेन्सॉरशिपशिवाय थेट आपल्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचणाऱ्या वेब सिरीज परदेशासह आता भारतातही झपाट्याने लोकप्रिय होत आहेत. सॅक्रेड गेम्सच्या तूफान यशानंतर आता आणखी एका वेब सिरीझच्या सर्वत्र चर्चा आहेत. अॅमेझॉन प्राइमवर 16 नोव्हेंबरपासून सुरू झालेल्या मिर्झापूर या सिरीजमध्ये एका अभिनेत्रीचा एंट्री सीन इंटरनेटवर व्हायरल होत आहे. यात अभिनेत्री चक्क एका लायब्ररीमध्ये मास्टरबेशन करताना दिसून आली. एका माध्यमाशी संवाद साधताना तिने हा सीन करणे कॉफी घेण्याइतके सोपे होते असे म्हटले आहे.
असा होता सीन...
नवाझुद्दीन सिद्दीकीसोबत 'हरामखोर' चित्रपटात शालेय विद्यार्थिनीची भूमिका साकारून लोकप्रिय झालेली अभिनेत्री श्वेता त्रिपाठी मिर्झापूर वेब सिरीझमध्ये गोलू गुप्ताची भूमिका साकारत आहेत. सिरीजच्या दुसऱ्या एपिसोडमध्ये गोलूची एंट्री झाली. यात गोलूची बहीण स्विटी तिला शोध असते. तेव्हा गोलू एका लायब्ररीच्या कोपऱ्यात आक्षेपार्ह अवस्थेत दिसून येते. कपाळावर घाम आणि हातात अश्लील साहित्य घेऊन ती मास्टरबेट करताना दिसून आली. यानंतर गोलू आपल्या बहिणीला विचारते की जगभरातील ज्ञान मिळाले का? तेव्हा स्विटी हळूच होय दीदी स्वर्गात जाण्याचे ज्ञान तर मिळाले! यापूर्वी स्वरा भास्कर, किआरा आडवाणी आणि नेहा धूपिया यांनी अशाच प्रकारचे बोल्ड सीन देऊन खळबळ माजली होती. त्याच यादीत आता श्वेता त्रिपाठीचे नाव जोडले गेले आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.