आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Shyam Ramsay, Who Made Famous Horror Films Like 'Virana' And 'Purani Haveli', Died At The Age Of 67.

'वीराना' आणि 'पुरानी हवेली' यांसारखे प्रसिद्ध हॉरर चित्रपट बनवणारे श्याम रामसे यांचे वयाच्या 67 व्या वर्षी निधन

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बॉलिवूड डेस्क : 80 आणि 90 च्या दशकामध्ये हॉरर चित्रपटांचा काळ आणणारे फिल्ममेकर श्याम रामसे यांचे वयाच्या 67 व्या वर्षी निधन झाले आहे. हृदयात होणाऱ्या वेदनांमुळे त्यांना कोकिलाबेन हॉस्पिटलमध्ये दाखल केले गेले होते. जिथे 18 सप्टेंबरला श्याम रामसे यांचे निधन झाले होते. 

विभाजनानंतर मुंबईला आले होते कुटुंब...  
श्याम रामसे ब्रदर्स या नावाने प्रसिद्ध सात रामसे भावांपैकी एक होते, जे आपले पिता फतेहचंद रामसिंघानी यांच्यासोबत विभाजनानंतर कराचीहुन मुंबईला आले होते. एबीपी न्यूजनुसार श्याम रामसे यांच्यावर विले पार्ले स्मशानभूमीमध्ये 18 सप्टेंबरला अंत्यसंस्कार केले जाणार आहे. 

'वीराना'चा सीक्वल बनवण्याची करत होते तयारी... 
श्याम यांचे मोठे भाऊ तुलसी रामसे यांनी 'वीराना' चित्रपट बनवला होता. मागच्या काही काळापासून ते या चित्रपटाचा सीक्वल बनवण्याची तयारी करत होते, ज्यासाठी ते खूप उत्साहितदेखील होते. यापूर्वी श्याम यांनी 1972 मध्ये बॉलिवूडचा पहिला भयपट 'दो गज जमीन के नीचे' बनवला होता.  

बातम्या आणखी आहेत...