आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

फडणवीसांना पाठिंबा देणारे श्यामसुंदर शिंदे आता उद्धव ठाकरेंच्या पाठीशी!

एका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

नांदेड : शेतकरी कामगार पक्षाचे राज्यातील एकमेव आमदार श्यामसुंदर शिंदे यांनी राजकीय हवा बदलताच पाठ फिरवली. अाधी भाजप म्हणजे देवेंद्र फडणवीस यांना पाठिंबा देणाऱ्या शिंदेंनी आता उद्धव ठाकरे यांना समर्थन दिले आहे.

श्यामसुंदर शिंदे हे खासदार प्रताप पाटील चिखलीकरांचे मेव्हणे आहेत. लोहा मतदारसंघातून ते विजयी झाले. त्यांना या मतदारसंघातून भाजपच्या तिकिटावर निवडणूक लढवायची होती. परंतु हा मतदारसंघ युतीच्या जागावाटपात शिवसेनेकडे गेला. त्यामुळे त्यांना भाजपची उमेदवारी मिळू शकली नाही. त्यानंतर त्यांनी शेतकरी कामगार पक्षाची उमेदवारी मिळवली. खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांचे चिरंजीव प्रवीण पाटील चिखलीकर व कन्या प्रणिता देवरे यांनी त्यांचा जोरकस प्रचार केला. लोहा मतदारसंघातून ते विजयी झाले. निवडणुकीचा निकाल जाहीर झाल्याबरोबर शिंदे यांनी देवेंद्र फडणवीस यांना पाठिंबा जाहीर केला. त्यानंतर त्यांनी खासदार चिखलीकरांसोबत फडणवीस यांची भेटही घेतली. शेतकरी कामगार पक्ष काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसच्या आघाडीत असूनही शिंदे यांनी फडणवीस यांना पाठिंबा दिल्याने त्या वेळी आश्चर्यही व्यक्त करण्यात येत होते. परंतु उद्धव ठाकरे राज्याचे मुख्यमंत्री होतील असे दिसताच शिंदे यांनी फडणवीसांचा पाठिंबा काढून उद्धव ठाकरे यांना जाहीर केला.

लाेकं टुणकन उडी मारतात : अशोक चव्हाण
 
श्यामसुंदर शिंदे यांच्या उद्धव ठाकरे यांना मिळालेल्या पाठिंब्याबाबत माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाणांनी शिंदे यांना चिमटा काढला. 'दिव्य मराठी'शी बोलताना चव्हाण म्हणाले, शिंदे यांनी झटकन भूमिका बदलली. काय लोक टुणकन उडी मारतात. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होतात असे दिसताच ते पटकन तिकडे आले आणि पाठिंबा दिला. यानंतर चव्हाण मिश्कील हसले.
 

बातम्या आणखी आहेत...