Home | International | Other Country | siberia snowfall news in Marathi

सैबेरियात गोठलेल्या नदीपात्रावर कार चालवण्याचा थरार

वृत्तसंस्था | Update - Mar 10, 2019, 11:02 AM IST

हे छायाचित्र रशियाच्या सर्वात थंड सैबेरियातील तिसरे मोठे शहर क्रास्नोयार्स्कमधील आहे. येथील येनेजी नदीचे पात्र गोठले आह

 • siberia snowfall news in Marathi

  मॉस्को - हे छायाचित्र रशियाच्या सर्वात थंड सैबेरियातील तिसरे मोठे शहर क्रास्नोयार्स्कमधील आहे. येथील येनेजी नदीचे पात्र गोठले आहे. ११ लाख लोकसंख्येच्या या शहराला पर्यटन वाढवण्याची इच्छा आहे. त्याच उद्देशातून उणे ४० अंश सेल्सियस एवढ्या थंडीत नदीपात्रात स्थानिकांना कार चालवण्याची सरकारने परवानगी दिली आहे.


  त्यासाठी आधी या पात्रावरून अवजड ट्रक व इतर वाहने चालवून प्रयोग करण्यात आले. ते यशस्वी ठरल्यानंतर ही मंजुरी मिळाली. त्यासाठी बर्फाळ भिंतीही तयार करण्यात आल्या आहेत. काही नियमही घालून देण्यात आले आहेत. चालकास पाच किलोमीटरपर्यंत वाहन चालवता येणार आहे. पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी या शहरात दरवर्षी बर्फावर आधारित उत्सवाचेही आयोजन केले जाते.


  अॅल्युमिनियम उत्पादक
  क्रास्नोयार्स्क शहर हे रशियातील सर्वात मोठे अॅल्युमिनियम उत्पादन करणारे शहर म्हणून परिचित आहे. येथे उष्णतेदरम्यान पारा १४ अंश सेल्सियस पर्यंत पोहोचतो. दरवर्षी २ लाख पर्यटक भेट देतात.


  ९० हजार कोटींचे उत्पन्न
  पर्यटनातून रशियाला ९० हजार कोटी रुपयांचे उत्पन्न होते. त्यापैकी ३० टक्के निधी सैबेरियाला दिला जातो. त्यातून सैबेरियाची अर्थव्यवस्था चालते. जगात सर्वाधिक पर्यटक फ्रान्सला पसंती देतात. त्यातून फ्रान्स ६ लाख कोटी कमावते.

Trending