आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अन् तिने स्वतःशीच केला विवाह! म्हणाली, 'माझी माझ्यापेक्षा चांगली काळजी दुसरे कुणीच घेऊ शकणार नाही'

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

लंडन - भारत असो की ब्रिटन किंवा आफ्रिका... आजकालच्या तरुणाईला त्यांच्या नातेवाईकांच्या एकाच प्रश्नाने छळले आहे, ते म्हणजे... लग्न कधी करणार आहेस? मुलगा किंवा मुलगी उच्च शिक्षण घेत असताना किंवा नवीन-नवीन नोकरी करत असताना पालकांचा हा एकच प्रश्न असतो. आपला मुलगा किंवा मुलगी कितीही चांगली नोकरी करत असले तरी जोपर्यंत त्यांचा विवाह होत नाही तोपर्यंत ते आयुष्यात 'सेटल' होणार नाही अशी समाजात विचारधारा बनलेली आहे. यातून मार्ग काढत आपले ध्येय कसे गाठायचा हे तरुणाईसमोर मोठे आव्हान आहे. परंतु, ब्रिटनच्या ऑक्सफोर्ड विद्यापीठात शिकणाऱ्या एका तरुणीने यातून कायमची सुटण्याचा मार्ग काढला आहे. तिचा संघर्ष आणि जिद्द पाहून आई वडिलांनाही हा लग्न मान्य करावा लागला.


माझी काळजी मीच घेणार!
> मूळची युगांडा येथील रहिवासी असलेली लुलू जेमिमाह (32) सध्या ऑक्सफोर्ड विद्यापीठात क्रिएटिव्ह रायटिंग विषयात मास्टर्सची डिग्री करत आहे. परंतु, गेल्या कित्येक वर्षांपासून तिचे आई-वडील तिच्यावर लग्नासाठी दबाव टाकत आहेत. 'यावर्षी तू लग्नासाठी तयार झाली नाहीस तर बघ' अशा धमक्याही तिला पालकांनी दिल्या होत्या. अशात लग्न केल्यास शिक्षणावर फोकस कसे करणार आणि नाही केल्यास आई-वडिल असेच दबाव टाकत राहतील. मग काय करावे? जेमिमाहने त्यातूनच मध्यम मार्ग निवडला. तिने स्वतःशीच विवाह केला. 
> या लग्नात जेमिमाहने आपल्या आई-वडील आणि मोजक्या मित्रमंडळीला अधिकृतरित्या वेडिंग कार्ड सुद्धा पाठवले होते. तिने लग्नात भाड्याने वेडिंग गाऊन घेतला. एखाद्या सामान्य लग्नाप्रमाणे तिने जमलेल्या पाहुण्यांसाठी स्पीच देखील तयार केली. कमतरता होती ती एका नवरदेवाची. परंतु, आपल्यापेक्षा आपली काळजी दुसरे कुणीही घेऊ शकणार नाही. त्यामुळे, स्वतःशीच लग्न करत असल्याचे जेमिमाहने जाहीर केले. या संपूर्ण लग्नसमारंभात तिने फक्त 2 ब्रिटिश पाउंड अर्थात जवळपास 200 रुपये खर्च केले आहेत. 


मुलीची शिकण्याची जिद्द पाहून भावूक झाले वडील...
> जेमिमाह जेव्हा 16 वर्षांची होती तेव्हाच तिच्या वडिलांनी तिच्या लग्नात आपण काय बोलणार हे लिहून ठेवले होते. जेमिमाह जेथून (युगांडा) आली, तेथे लग्नाला त्यातही मुलींच्या लग्नाला खूप महत्व आहे. कित्येक वर्षांपासून ते तिच्या लग्नाची तयारी करत होते. परंतु, जेमिमाहमध्ये शिकण्याची तसेच आपल्या कुटुंबासाठी आणि स्वतःसाठी काही मोठे करण्याची जिद्द पाहून तिच्या वडिलांच्या डोळ्यात आनंदाचे अश्रू आले.
> एका गरीब आफ्रिकन देशात जन्मलेली आपली मुलगी इतकी शिकेल याची वडिलांनी कल्पनाही केली नव्हती. शाळेत आणि ज्युनिअर कॉलेजमध्ये तिने नेहमीच टॉप केले. अतिशय अभ्यासू आणि लक्ष्यावर केंद्रीत राहणारी जेमिमाह हिने 2013 मध्ये ऑस्ट्रेलियन विद्यापीठाकडून शिष्यवृत्ती जिंकली. त्याच शिष्यवृत्तीच्या बळावर तिने मीडिया आणि फिल्म या विषयात ऑस्ट्रेलियन विद्यापीठात पद्वीचे शिक्षण घेतले. त्यावेळी समस्त स्थानिकांमध्ये तिचा गौरव झाला होता. यानंतरही तिने आणखी शिकण्यासाठी ब्रिटनवर फोकस केले आणि 2017 मध्ये ऑक्सफोर्ड विद्यापीठात शिकण्यासाठी अर्ज दाखल केला. ती सध्या ऑक्सफोर्ड विद्यापीठात क्रिएटिव्ह रायटिंग विषयात मास्टर्सची डिग्री करत आहे. लग्न करून ती इतक्या वर्षांची तपश्चर्या वाया जाऊ देण्याच्या पक्षात मुळीच नव्हती. ही गोष्ट आता तिच्या आई-वडिलांच्याही लक्षात आली आहे. आणि हो... ती किती खुश आहे हे तिच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसून येत आहे.

बातम्या आणखी आहेत...