आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
बीजिंग- चीनच्या वुहानमध्ये कोरोना व्हायरस संक्रमणाशी सामना करण्यासाठी प्रशासनाने आक्रामक पवित्रा घेतला आहे. पोलिस आता लोकांच्या घरात घुसून तपास करत आहे. सरकारकडून पोलिसांना निर्देश देण्यात आले आहे की, ज्यांना कोरोनाची लागन झाली आहे, त्यांना आयसोलेशनमध्ये पाठवण्यात यावे. मानवाधिकार कार्यकर्त्यांचे यावर म्हमने आहे की, सरकारने इतके करुनही संक्रमण पसरण्यापासून थांबवू शकत नाहीये.
रुग्णांना सध्या तात्पुरत्या हॉस्पिटलमध्ये दाखल केले जात आहे
हॉस्पीटल्समध्ये जागेच्या कमतरतेमुळे अधिकाऱ्या रुग्णांना तात्पुरत्या हॉस्पीटल्समध्ये दाखल करत आहेत. वुहानमध्ये स्पोर्ट्स स्टेडियम, एग्जीबिशन सेंटर आणि बिल्डिंग कॉम्प्लेक्समध्ये रुग्णांना ठेवले जात आहे. होंगाशान स्टेडियममध्ये तपासणीसाठी मशीन्स लावण्यात आल्या आहेत. जर एखाद्या रुग्णाला मोठ्या उपचाराची गरज भासल्यास त्याला सर्वांपासून लांब ठेवले जात आहे.
माहिती लपवण्यासाठी मोठ्या टेक कंपन्यांवर सरकारकडून नियंत्रण ठेवले जात आहे
यूनिव्हर्सिटी ऑफ हाँगकाँसोबत काम करत असलेली स्वतंत्र संस्था ‘द चाइना मीडिया प्रोजेक्ट’ ने सांगित्यानुसार, चीन प्रशासनाने सोशल मीडिया कंपन्यांवर आजाराबाबत चुकीच्या बातम्या पसरवल्याचा आरोप लावण्यात आला आहे. रिपोर्टमध्ये सांगण्यात आले आहे की, चीनमधील सिना वीबो, टेनसेंट आणि बाईडांससारख्या मोठ्या टेक कंपन्या सरकारकडून चालवल्या जात आहेत आणि फक्त सकारात्मक बातम्याच चीनबाहेर येऊ दिल्या जात आहेत.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.