Home | National | Madhya Pradesh | Sickening Incident: Man Rapes Mother In front Of Own Son Arrested From MP

सात वर्षीय मुलाच्या डोळ्यांदेखत बाप करत होता आजीवर बलात्कार, पीडितेने नातवंडांसह पळ काढून गाठले Police Station

दिव्य मराठी वेब टीम | Update - Sep 05, 2018, 02:44 PM IST

आरोपीच्या अवघ्या 7 वर्षांच्या मुलाने आजीवर बापाकडून होणारा अत्याचार आपल्या डोळ्यांनी पाहिला आहे.

 • Sickening Incident: Man Rapes Mother In front Of Own Son Arrested From MP

  भोपाळ - मध्यप्रदेशच्या बरवानी जिल्ह्यातील एका गावात टाळके फिरवणारी घटना घडली आहे. सुरानी गावात राहणाऱ्या एका 30 वर्षीय नराधमाने आपली आई झोपेत असताना तिच्यावर बलात्कार केला. पोलिसांनी या प्रकरणात पीडितेच्या आरोपी मुलाला अटक केली आहे. पोलिसांच्या माहितीप्रमाणे, ही घटना 2 सप्टेंबर रोजी घडली तेव्हा पीडितेचा पती आणि आरोपीचा पिता घराबाहेर होता. तसेच घरात तीन नातवंड उपस्थित होती. त्यापैकीच एक आरोपीच्या अवघ्या 7 वर्षांच्या मुलाने आजीवर बापाकडून होणारा अत्याचार आपल्या डोळ्यांनी पाहिला आहे.


  विरोध केला तेव्हा गळ्यावर ठेवला कोयता...
  पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीला 3 मुले-मुली आहेत. त्याची पत्नी दोन वर्षांपूर्वी त्याला सोडून निघून गेली. तेव्हापासून तो आपल्या लेकरांसह आई आणि वडिलांच्या घरात राहत होता. ही घटना घडली त्यावेळी, पीडितेचा विकलांग पती शेतावर कामानिमित्त गेला होता. आई झोपेत असताना नराधमाने तिच्यावर बळजबरी केली. विरोध केला तेव्हा तिच्या गळ्यावर धारदार कोयता ठेवला आणि जिवे मारण्याच्या धमक्या देऊन अतिप्रसंग केला.


  मुलाने पाहिले बापाचे कृत्य
  अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, आजीवर अत्याचार होत असताना तिचा 7 वर्षांचा नातू सर्व आपल्या डोळ्यांनी पाहत होता. परंतु, बापाचे राक्षसी रूप पाहून तो इतका घाबरला की त्याने कुणाला काहीही सांगितले नाही. कशी-बशी आपल्या मुलाच्या तावडीतून सुटल्यानंतर महिलेने आपल्या तिन्ही नातवंडांना घेऊन शेताकडे पळ काढला. यानंतर आपल्या नातेवाइकांना भेटून झालेल्या अत्याचाराची हकीगत मांडली. त्यांनी पीडितेला घेऊन पोलिस स्टेशन गाठले आणि आता त्याच तक्रारीवरून पोलिसांनी आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत. आरोपी विरोधात बलात्कार आणि गुन्हेगारी षडयंत्राचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Trending