आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

सिद्धगंगा मठाचे स्वामी शिवकुमार यांचे निधन; १११ व्या वर्षी अखेरचा श्वास

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बंगळुरू - कर्नाटकातील सिद्धगंगा मठाचे मठाधीश शिवकुमार स्वामी यांचे सोमवारी वयाच्या १११ व्या वर्षी निधन झाले. त्यांनी सकाळी ११.४४ वाजता शेवटचा श्वास घेतल्याची माहिती मुख्यमंत्री कुमारस्वामी यांनी दिली.  मंगळवारी सायंकाळी ४ वाजता त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. शिवकुमार स्वामी लिंगायत समुदायाच्या सिद्धगंगा या मुख्य मठाचे प्रमुख होते. 


मुख्यमंत्र्यांनी सांगितले की, स्वामींच्या निधनामुळे राज्यात तीन दिवसांचा दुखवटा पाळला जाणार आहे. कर्नाटकाच्या राजकारणावर िसद्धगंगा मठाचा मोठा प्रभाव आहे. हा मठ बंगळुरूपासून ८० किमीवरील तुमकुरुमध्ये आहे. कर्नाटकात त्यांच्या मठांची संख्या ४०० पेक्षा जास्त आहे. कर्नाटकात लिंगायत समुदायाची १७ ते १८ टक्के लोकसंख्या आहे. त्यांचा १०० विधानसभा मतदारसंघांवर प्रभाव आहे. २०१३ मधील विधानसभा निवडणुकीत २२४ पैकी ५२ जागी याच समुदायातील उमेदवार जिंकले होते. त्यांचे भक्त त्यांना बसवेश्वरांचा अवतार मानायचे. लिंगायत समाजाचा हा मठ ३०० वर्षांपूर्वीचा आहे. मठात १० हजारांहून जास्त मुलांना भोजन, शिक्षण आणि राहण्यासाठी घर अशा सुविधा मोफत दिल्या जातात. याशिवाय गरिबांसाठी रुग्णालये आणि मोफत निवास व्यवस्था पुरवली जाते.

 

दीर्घायुष्याचे रहस्य   
शिवकुमार स्वामीजींच्या दीर्घायुष्याचे रहस्य त्यांचा आहार आणि जीवनशैली होती. ते मसालेदार आणि तळलेले पदार्थ खात नसत. वयाची शंभरी ओलांडली तरी ते कुणाचाही आधार न घेता चालत-फिरत होते. त्यांना व्यवस्थित ऐकू यायचे. स्वामींचा दिवस रात्री अडीच वाजताच सुरू व्हायचा. 

0