आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सोलापुरात हजारो भाविकांच्या उपस्थितीत रंगला ग्रामदैवत सिद्धरामेश्वरांचा विवाह सोहळा

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • सकाळपासूनच नंदीध्वज मार्गावर लगीनघाई
  • ‘सत्यम् सत्यम् दिड्यम, दिड्यम’चा गजर

सकाळपासूनच नंदीध्वज मार्गावर लगीनघाई
सोलापूरचे ग्रामदैवत सिद्धरामेश्वर यात्रेतील मुख्य साेहळा म्हणजे सिद्धेश्वर आणि योगदंडाचा विवाह. जी प्रतिकात्मक कुंभार कन्या हाेती. मंगळवारी सकाळपासूनच  नंदीध्वज मार्गावर प्रत्येकाचीच हाेती लगीनघाई. कुणी रंगावलीत रंगले, तर कुणी बंदाेबस्त लावण्यात दंग जाहले. साक्षात सिद्धरामाच्या लग्नाला हजेरी लावण्याची पळापळच हाेती.  

‘एकदा भक्तलिंग हर्र बोला हर्र,

‘एकदा भक्तलिंग हर्र बोला हर्र, श्री सिद्धेश्वर महाराज की जय...’ असा जयघाेष करीत सकाळी सातला हिरेहब्बू वाड्यातून सातही मानाचे नंदीध्वज श्री सिद्धेश्वर मंदिराच्या दिशेने निघाले. सनई-चौघडा, बँड पथकांच्या निनादात, ढोलच्या गजरात मिरवणुकीस सुरुवात झाली. ‘सत्यम् सत्यम् दिड्यम, दिड्यम’चा गजर 

 दुपारी १२ वाजता पंचध्वज पहिल्यांदा मंदिरात पोहाेचले. त्यानंतर लगेच धार्मिक विधींना सुरुवात झाली. साडेबारा वाजता मंगलाष्टकांना सुरुवात झाली. ‘सत्यम् सत्यम् दिड्यम, दिड्यम’ असा गजर झाला अन् हजाराे हात अक्षतांसाठी उंचावले. लाखाे नयनांनी हा सुवर्ण क्षण डाेळ्यांत साठवून ठेवला.  १२ वाजून ४५ मिनिटांनी अक्षता सोहळा झाला. तम्मा शेटे यांनी संमती वाचन केले. योगदंडाच्या साक्षीने सुगडी पूजन हिरेहब्बू व देशमुख यांनी केले.