आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराएंटरटेन्मेंट डेस्कः मराठी सिनेइंडस्ट्रीतील हॉट जोडी म्हणून अभिनेता सिद्धार्थ चांदेकर आणि अभिनेत्री मिताली मयेकर यांचे नाव घेतले जाते. लवकरच ही जोडी लग्नाच्या बेडीत अडकणार आहे. दोन वर्षांपूर्वी व्हॅलेंटाइन डेला दोघांनीही रिलेशनशिपमध्ये असल्याचे सांगितले होते. काही महिन्यांपूर्वीच दोघांचा साखरपुडादेखील झाला. या जोडीने नुकतेच एक रोमँटिक फोटोशूट केले आहे. विशेष म्हणजे दोघांनीही अंडरवॉटर फोटोशूट केले असून त्यांचे हॉट आणि बोल्ड फोटो सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाले आहेत.
सिद्धार्थ आणि मितालीने आपल्या इंस्टाग्रामवर हे फोटो शेअर केले आहेत. त्यांच्या या फोटोंवर काही तासात लाईक्सचा पाऊस पडलाय. व्हाइट कलरच्या आउटफिटमध्ये त्यांनी हे फोटोशूट केले असून त्यांची रोमँटिक केमिस्ट्री लक्ष वेधून घेते.
फॅशन फोटोग्राफर गौतम हिंगे यांनी सिद्धार्थ आणि मितालीची अदा आपल्या कॅमे-यात कैद केली आहे.
सिद्धार्थ आणि मितालीने यापूर्वीदेखील रोमँटिक अंदाजात फोटोशूट केले होते. त्यांच्या या फोटोंवरदेखील त्यांच्या चाहत्यांनी कौतुकाचा वर्षाव केला होता. सध्या हे दोघेही ऑस्ट्रेलियात असून येथे ते एका ऑस्ट्रेलियन चित्रपटाचे चित्रीकरण करत आहेत.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.