आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'महाराष्ट्राचा फेवरेट कोण 2019'च्या सोहळ्यात सिद्धार्थ जाधव झाला इमोशनल, हे आहे कारण

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

एंटरटेन्मेंट डेस्कः 'महाराष्ट्राचा फेवरेट कोण?' हा मराठी कलाक्षेत्रातील सर्वांत मोठा सोहळा आहे. 'झी टॉकीज' दरवर्षी हा धमाकेदार कार्यक्रम आयोजित करते. या सोहळ्याच्या निमित्ताने संपूर्ण मराठी सिनेसृष्टीतील कलाकार मंडळी एकत्र जमतात.  दरवर्षीप्रमाणे यंदाही 'रेड कार्पेट'वर मराठी चित्रपटसृष्टीतील अनेक तारेतारका अवतरल्या होत्या. या दिमाखदार सोहळ्यात अभिनेता सिद्धार्थ जाधव भावुक झालेला पाहायला मिळाला.

प्रेक्षकांचा लाडका अंकुश चौधरी, यंदाच्या 'फेवरेट स्टाईल आयकॉन' पुरस्काराचा मानकरी ठरला. या विभागात 'महाराष्ट्राचा फेवरेट कोण 2019'मध्ये सिद्धार्थ जाधवलासुद्धा नामांकन मिळालेले होते. आपल्या या खास मित्राला पहिल्यांदा नामांकन मिळाले, म्हणून अंकुशने त्याच्यासोबत हा अवॉर्ड शेअर करण्याचा निर्णय घेतला. मित्राचा हा दिलदारपणा पाहून, सिद्धार्थ भावुक झाला. सिद्धार्थला पहिल्यांदाच 'स्टाईल आयकॉन' म्हणून नामांकन मिळाले होते, त्याविषयी बोलताना तो म्हणाला की, "इतक्या वर्षांच्या कारकिर्दीत, आज पहिल्यांदाच 'स्टाईल आयकॉन'च्या विभागात मला नामांकन मिळाले आहे, याचा मला खूपच आनंद झाला. नेहमी मोठ्या भावाप्रमाणे माझ्यासोबत आधारस्तंभ म्हणून उभा राहिलेला माझा मित्र अंकुश, याच्या मदतीने ही गोष्ट साध्य करता आली. त्याच्यासोबत खूप शिकायला मिळालं. त्याच्या मार्गदर्शनानेच, मी माझ्या लुक्स आणि स्टाईलवर मेहनत घ्यायला सुरुवात केली आहे. यंदा अंकुश 'स्टाईल आयकॉन' ठरला, आणि त्याच वर्षी मलाही नामांकन मिळाले आहे. यासाठी मी 'महाराष्ट्राचा फेवरेट कोण'चा खुप आभारी आहे."