आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Siddharth Malhotra And Parineeti Chopra Starrer Film 'Jabaria Jodi' Trailer Release, Story Is Based On Bihar's Background

सिद्धार्थ मल्होत्रा आणि परिणीती चोप्रा स्टारर चित्रपट 'जबरिया जोडी'चा ट्रेलर रिलीज, बिहारच्या पार्श्वभूमीवर आधारित आहे कथा 

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बॉलिवूड डेस्क : सिद्धार्थ मल्होत्रा आणि परिणीती चोप्रा स्टारर चित्रपट 'जबरिया जोड़ी'चा ट्रेलर रिलीज झाला आहे. 2.58 मिनिटांच्या या व्हिडीओनुसार, चित्रपटाची कथा बिहारच्या पार्श्वभूमीवर आधारित आहे. ट्रेलरच्या सुरुवातीला डायलॉगद्वारे सांगितले गेले आहे की, बिहारमध्ये तीन पद्धतीने जोड्या बनतात. डायलॉग आहे, 'बिहार मे तीन तरह से जोड़ियां बनती हैं बाबू...हिम्मत वालों की अरेंज जोड़ी...किस्मत वालों की लव जोड़ी ...और दहेज के लालचियों की जबरिया जोड़ी.'

 

दुसऱ्यांदा एकत्र दिसणार आहेत सिद्धार्थ-परिणीती... 
सिद्धार्थ आणि परिणीती दुसऱ्यांदा एकत्र काम करत आहेत. यापूर्वी ते 2014 मध्ये रिलीज झालेला चित्रपट 'हंसी तो फंसी'मध्ये एकत्र दिसले होते. जो बॉक्सऑफिसवर डिजास्टर ठरला होता. मात्र, 'जबरिया जोड़ी'चा ट्रेलर मजेदार आहे. चित्रपटात सिद्धार्थ अभय सिंहच्या रोलमध्ये दिसणार आहे, जो नावरदेवांना किडनॅप करून बळजबरी त्यांचे लग्न करून देतो. परिणीती बबली यादवच्या भूमिकेत आहे. दोघे एकमेकांच्या प्रेमात पडतात. पण अभयला राजकारणात जायचे असल्यामुळे लग्न करायचे नसते.  

 

2 ऑगस्टला रिलीज होणार आहे चित्रपट... 
ट्रेलरमध्ये जेथे मजेदार डायलॉग्स कॉमेडीचा तडका लावत आहेत तर इमोशनदेखील पाहायला मिळत आहेत. प्रशांत सिंहच्या डायरेक्शनमध्ये बनत असलेल्या या चित्रपटात संजय मिश्रा, जावेद जाफरी आणि अपारशक्ति खुरानादेखील मुख्य भूमिकेत आहेत. एकता कपूर आणि तिची आई शोभा कपूरने शैलेश आर सिंहसोबत मिळून बालाजी मोशन पिक्चर्सच्या बॅनरमध्ये हा चित्रपट प्रोड्यूस केला आहे. 2 ऑगस्टला चित्रपट रिलीज होणार आहे.  

बातम्या आणखी आहेत...