आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Siddharth Malhotra Denied The Rumors Of Linkup With Kiara Adwani, Said, 'Kiara Is My Good Friend, Not Girlfriend'

सिद्धार्थ मल्होत्राने अफेयरच्या बातम्यांचे केले खंडन, म्हणाला - 'कियारा फक्त माझी मत्रीण आहे, गर्लफ्रेंड नाही'

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बॉलिवूड डेस्क : खूप काळापासून इंडस्ट्रीमध्ये सिद्धार्थ मल्होत्रा आणि कियारा आडवाणी यांचे नाव जोडले जात आहे. खास गोष्ट ही आहे की, लिंकअपच्या बातम्यांमुळे दोघेही चिडले नाहीत, कियाराने तर अशातच चेष्टेत सिद्धार्थ सर्वात एलिजिबल बॉयफ्रेंड असल्याचे सांगितले होते. तसेच अशातच जेव्हा सिद्धार्थसोबत याबाबतीत बोलणे झाले तेव्हा त्याने सांगितले की, ‘कियारा आणि माझ्यामध्ये कोणतेही बॉयफ्रेंड किंवा गर्लफ्रेंडचे नाते नाही. ती केवळ एक चांगली मैत्रीण आहे आणि चांगली को-स्टारसुद्धा.' सध्या दोघेही चित्रपट 'शेरशाह' च्या शूटिंगमध्ये व्यस्त आहेत. 

 

'साहो'मध्ये स्पेशल सॉन्ग करू शकते कियारा... 
कियाराचा अशातच रिलीज झालेला चित्रपट 'कबीर सिंह' बॉक्स ऑफिसवर खूप चांगले प्रदर्शन करत आहे. आता असे ऐकण्यात आले आहे की, तिला मोठ्या बजेटचा चित्रपट 'साहो'च्या मेकर्सने एका स्पेशल सॉन्गसाठी अप्रोच केले आहे. कियाराने साउथच्या अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे आणि तिथेही तिचे चांगले फॅन फॉलोइंग आहे. त्यामुळे मेकर्स विचार करत आहेत की, कियाराला घेऊन चित्रपटात एक स्पेशल गाणे टाकले जावे. जर कियाराने या गाण्यासाठी होकार दिला तर याचे शूटिंग लवकरच सुरु होईल. 

बातम्या आणखी आहेत...