आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Siddharth Malhotra Is Ready For Upcoming Biopic 'Shershah', Shooting Will Soon Starts In Kargil Hills

आगामी बायोपिक 'शेरशाह' साठी सिद्धार्थ मल्होत्रा सज्ज, करगिलच्या डोंगरांमध्ये लवकरच केले जाणार आहे शूटिंग 

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

एंटरटेन्मेंट डेस्क : सिद्धार्थ मल्होत्राचा आगामी चित्रपट 'शेरशाह' कारगिल युद्धातील हीरो विक्रम बत्रा यांच्या जीवनावर आधारित आहे. या चित्रपटाचे शूटिंग याच महिन्यात कारगिलच्या मूळ लोकेशन्सवर सुरू होणार आहे. सूत्रानुसार, चित्रपटाचे मेकर्स कारगिलमध्ये काही इंटेन्स अॅक्शन सीन शूट करू इच्छित आहेत. हे दृश्य येथे शूट होणे गरजेचे आहे. कारण यामुळे लोकेशन अधिकृत वाटेल. मात्र, काही दिवसांपूर्वी सरकारने सेक्शन ३७० आणि ३५ ए हटवल्याच्या घोषणेनंतर तेथे शूटिंग करावे की नाही याची चर्चा होती. मात्र, आता टीमने उशिरा का होईना, पण तेथेच शूटिंग करण्याचा निर्णय घेतला आहे. तेथे शूटिंग सुरू होऊ शकते, असे ऐकिवात आहे. 
 

किआरासोबत एक रोमँटिक गाणेदेखील हाेईल शूट...  
कारगिलचे निर्माते या अॅक्शन दृश्याच्या व्यतिरिक्त सिद्धार्थ आणि किआरा आडवाणीमध्ये काही भावुक आणि रोमँटिक दृश्यांचेदेखील शूटिंग करतील. किआरा यात डिंपलची भूमिका साकारत आहे, जी सिद्धार्थच्या पात्रावर प्रेम करत होती. यानंतर किआरा कारगिलवरून परत येईल आणि सिद्धार्थ तेथेच एका महिन्यापर्यंत शूटिंग करणार आहे. 

बातम्या आणखी आहेत...