आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Siddharth Malhotra Was Failed In Ninth Class In School, Revealed Himself In The Kapil Sharma Show

नववीमध्ये नापास झाला हाेता सिद्धार्थ मल्होत्रा, कपिल शर्मा शोदरम्यान स्वतः केला खुलासा  

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

एंटरटेन्मेंट डेस्क : 'द कपिल शर्मा' शोमध्ये एकामागून एक मोठमोठे कलाकार येत आहेत. येत्या आठवड्यात देखणा अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा आणि बडबडी अभिनेत्री परिणीती चोप्रा येणार आहेत. कपिलने आपल्या चतुर बोलण्याने आणि इतर कलाकारांनी त्यांच्या धमाल विनोदी अॅक्ट्सने या दोघांचे भरपूर मनोरंजन केले. 'जबरिया जोडी' या आपल्या आगामी चित्रपटाचे प्रमोशन करण्यासाठी आलेल्या या कलाकारांनी आपल्या लहानपणापासून ते अभिनेते झाल्यानंतरचे अनेक किस्से सांगितले. या वेळी सिद्धार्थ मल्होत्राने सांगितले, मुलींमुळे तो नववीत नापास झाला होता. 

 

'स्टुडंट ऑफ द इयर' चित्रपटातून पदार्पण केलेल्या सिद्धार्थचे खूप चाहते आहेत. त्यात विशेषतः मुली आहेत. त्याचे देखणे रूप, शरीरयष्टी, अभिनय कौशल्य आणि जबरदस्त व्यक्तिमत्त्व यामुळे मुली त्याच्यावर फिदा होतात. सिद्धार्थदेखील हे यशस्वीरीत्या साध्य करतो. या कार्यक्रमात कपिलने त्याला तो नववीत असताना नापास झाला होता, या अफवेबद्दल खुलासा करायला सांगितला असता, सिद्धार्थ म्हणाला, हाे, खरं आहे. मी नववीत असताना मुलांच्या शाळेत होतो. पण त्यानंतर मुलामुलींच्या एकत्र शाळेत गेले. पुढे दहावी आणि अकरावीत मी चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झालो.