आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करा"बिग बॉस 13' मध्ये शेफाली जरीवाला चांगला खेळ खेळत आहे. तिचे पती पराग त्यागीने नुकतेच दिव्य मराठीसाेबत चर्चा केली...,
दर आठवड्याला बिग बॉसच्या घरची परिस्थिती बदलत असते. जे पूर्वीचे मित्र होते ते आता शत्रू बनले आहेत. जे शत्रू होते ते आता मित्र आहेत. संपूर्ण घर गोंधळून गेले आहे. मात्र या शोच्या घरची गती दर आठवडयात बदलते ही एक चांगली गोष्ट आहे. हा खेळ मनाने नव्हे तर डोक्याने खेळावा लागतो. शेफाली भावनिक आहे आणि तिच्यातील हा बदल पाहून खूप आनंद झाला आहे. हा शो लोकांना बदलण्यात खूप मदत करतो. हे मी ऐकले होते शेफालीचा हा बदल पाहून मी विश्वास ठेवण्यास सुरुवात केली आहे.
सिद्धार्थ आणि शहनाज यांच्यात काहीतरी शिजतेय-
सिद्धार्थ आणि शहनाज यांच्यात काहीतरी शिजतेय असे वाटते. त्यांचे भावनिक नाते तयार झाले आहे, पण ते शोपुरते मर्यादीत राहत की पुढे जाते, हे तर काळच ठरवेल.
बिग बॉसमध्ये जाण्याची इच्छा -
वाइल्ड कार्ड एन्ट्रीद्वारे मला संधी मिळाल्यास नक्की या शोमध्ये जायला आवडेल. मला शेफालीची खूप आठवण येत आहे. तिलाही माझी खूप आठवण येत आहे, मला माहीत आहे. मला एक संधी मिळाली तर मी या शोमध्ये जाऊन खेळ खेळणार. आम्ही फक्त नच बलियेमध्ये एकत्र काम केले होते. यापूर्वी कधी केले नाही. ती बाहेर आली तर आम्ही पुन्हा सोबत जाण्याचा प्रयत्न करू.
मी दक्षिण चित्रपटाच्या शोधात आहे-
आघोरी या मालिकेनंतर मी दक्षिणेकडील चित्रपटाकडे लक्ष द्यायला सुरुवात केली आहे. नुकतेच माझे दक्षिणेतील दोन चित्रपट प्रदर्शित झाले. त्यांना प्रतिसादही चांगला मिळाला. भविष्यात मी दक्षिणेत कामासाठी जाणार आहे, तिथे मी या आगोदर चांगल्या लोकांसोबत काम केले आहे. म्हणून मी हा प्रवास पूढे चालू ठेवू इच्छीतो, लवकरच मी टेलिव्हीजनवर परत येणार आहे. यात प्रेक्षक मला वेगळ्या भूमिकेत बघणार आहेत, जी आजपर्यंतच्या भूमिकेपेक्षा वेगळी असणार आहे.
शहनाज किंवा सिद्धार्थने या सीझनचे टायटल जिंकावे असे वाटते
शेफालीने हा खेळ जिंकावा, अशी माझी इच्छा आहे. पण ती जिंकली नाही तर शहनाज किंवा सिद्धार्थने या हंगामाचे विजेतेपद मिळवावे, असे वाटते. असीमने हा खेळ जिंकावा, असे मला आधी वाटायचे. मात्र आता वाटत नाही. कारण तो आता बदलला आहे, खूप आक्रमक झाला आहे, त्यामुळे त्याच्या जिंकण्याची शक्यता कमी आहे. सिद्धार्थ चांगला खेळत आहे, शहनाजदेखील बऱ्यापैकी मजेदार खेळत आहे. सिद्धार्थ जिंकण्याची थोडी जास्त शक्यता आहे.
आम्हाला मुले आवडतात
कुटुंब नियोजनाचा विचार करत असताना शेफालीला बिग बॉसची ऑफर मिळाली होती, त्यामुळे तो निर्णय घेऊ शकलो नाही. आम्हाला दोघांनाही मुले खूप आवडतात. जेव्हा मुले होतील तेव्हा आमच्या व्यवसायातून ब्रेक घेऊ. कारण मला मुलांचे संगोपन करायला, त्यांना वेळ द्यायला आवडते. मुलांना वेळ देणे गरजेचे आहे. असाच विचार शैफालीदेखील करते.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.