आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Siddhartha Malhotra Learned Bihari Style By Watching Bhojpuri Superstar Nirhua Movies

भोजपुरी सुपरस्टार निरहुआचे चित्रपट पाहून पाहून सिद्धार्थ मल्होत्रा शिकला बिहारी शैली; ‘जबरिया जोड़ी'साठी घेतली मेहनत

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - सिद्धार्थ मल्होत्राचा आगामी चित्रपट ‘जबरिया जोड़ी’ आहे. यात ताे बिहारच्या एक दबंग युवक अभय सिंहची भूमिका साकारत आहे. ताे लाेकांचे बळजबरी लग्न लावून देेत असतो. या चित्रपटाचे संवाद राज शांडिल्यने लिहिले आहेत. दिग्दर्शक प्रशांत सिंह आणि लेखक संजीव झादेखील बिहारचे आहेत. सिद्धार्थने आपल्या रोलसाठी लेखक, दिग्दर्शकासोबत अनेक बैठका घेतल्या.


याविषयी राज सांगतात...,. अभय सिंहच्या पात्राची बॉडी लँग्वेज आणि टोन पकडण्यासाठी सिद्धार्थने अनेक पद्धती आजमावल्या. त्याने यासाठी विशेषकरून भोजपुरी चित्रपटाचा सुपरस्टार दिनेश लाल यादव ऊर्फ निरहुआचे बरेच चित्रपट पाहिले. यामुळे तो बिहारी शैली कॅच करू शकला. 

 

राजने पुढे सांगितले..., चित्रपटात अस्सल बिहारी भाषेचा वापर करण्यात आलेला नाही. कारण हा चित्रपट पूर्ण भारताच्या प्रेक्षकांसाठी आहे. त्यामुळे थेट बिहारी भाषेचा वापर केला नाही, कारण तो भाेजपुरी चित्रपट बनला असता. आम्हाला असे करायचे नव्हते. त्यामुळे हा धोका पत्करू शकत नव्हतो. भोजपुरी चित्रपट कौटुंबिक नसतो, असे लोकांना वाटते. त्यामुळे आम्ही ही रिस्क घेणार नव्हतो. आमचा चित्रपट संपूर्ण कुटुुंबासोबत पाहू शकता. सिद्धार्थने यावर बरीच मेहनत घेतली आहे. त्यांचा टोन रवीश कुमार आणि मनोरंजन भारतीसारखा होऊ शकत नाही. मात्र, बिहारी युवकाचे त्याचे रूप पाहून लाेक नक्कीच चकित होतील. याची गॅरंटी आहे.
 

बिहारच्या बाहुबलीकडूनही घेतली प्रेरणा
या भूमिकेसाठी सिद्धार्थने बिहारच्या बाहुबली लोकांची बॉडी लँग्वेज आणि टोन यांचीही मदत घेतली. त्याने अनेक लोकांचे निरीक्षण केले.

 

परिणीतीला घ्यावी लागली जास्त मेहनत

बिहारी पात्र आत्मसात करण्यासाठी परिणीती चोप्रालादेखील जास्त मेहनत घ्यावी लागली नाही. तिने खूपच सहजपणे ते आत्मसात केले. सिंगल टेकमध्ये तिने आपले संवाद बाेलले. बिहारी तरुण-तरुणीच्या भूमिकेसाठी निर्मात्यांनी सिद्धार्थ आणि परिणीतीलाच फायनल घेतले होते. ‘हंसी तो फंसी’मध्ये त्यांच्या जोडीला पसंती मिळाली होती.

 

या कलाकारांनीही घेतली भाषाशैलीसाठी मेहनत

 

> तनु वेड्स मनु रिटर्न्स
या चित्रपटात कंगनाने दत्तोच्या पात्रासाठी हरियाणवी भाषा शिकली होती. तिचे खूप कौतुक झाले होते.

 

> बत्ती गुल मीटर चालू
यात शाहिद कपूर आणि श्रद्धा कपूर दोघांनी उत्तराखंडची भाषा चांगल्या प्रकारे बोलली. तेथील शब्द ‘बल’ आणि ‘ठहरा’चा चांगला वापर केला होता. 

 

> जीरो
शाहरुख खानने या चित्रपटासाठी  मेरठिया शैलीमध्ये आपल्या पद्धतीने संवाद  म्हटले.

 

> सोनचिड़िया
सुशांत सिंह राजपूत आणि मनोज वाजपेयी यांनीदेखील चंबळच्या खोऱ्यात बोलल्या जाणाऱ्या भाषेचा वापर केला होता.

बातम्या आणखी आहेत...