आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सिद्धेश्वर एक्स्प्रेस आजपासून पाच मिनिटे आधी सुटणार

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर- सोलापूर-मुंबई सिद्धेश्वर एक्स्प्रेसची वेळ बदलण्यात आली असून, आता ही गाडी पाच मिनिटे आधी म्हणजे १० वाजून ४० मिनिटांनी सोलापूर स्थानकावरून सुटणार आहे. बुधवारपासून (दि. १५) हा बदल अमलात येणार आहे. यासह कोल्हापूर- सोलापूर एक्स्प्रेस सोलापूर स्थानकावर पाच मिनिटे उशीरा पोहोचणार आहे. 


सिद्धेश्वर एक्स्प्रेसच्या मुंबईला पोहोचण्याच्या व मुंबईहून सोलापूरकडे निघण्याच्या वेळेत कोणताही बदल करण्यात आलेला नाही. सिध्देश्वर एक्स्प्रेसच्या थांब्यांमध्येही बदल करण्यात आलेला नाही. कोल्हापूर-सोलापूर एक्स्प्रेस (११०५२) नियमित वेळेनुसारच कोल्हापूर स्थानकावरून निघेल. सोलापूर स्थानकावर मात्र ही गाडी सकाळी पाच मिनिटे उशिरा म्हणजे सकाळी सात वाजून ३५ मिनिटांनी पोहोचेल. 

बातम्या आणखी आहेत...