आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जुळ्या बहिणींची साेबत पदक जिंकण्याची माेहीम कायम; सिद्धीचा डबल धमाका!

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद- राष्ट्रीय खेळाडू रिद्धी आणि सिद्धी या दाेघी जुळ्या हत्तेकर भगिनींनी एकाच स्पर्धेत साेबत पदक जिंकण्याची माेहीम कायम ठेवली. नव्या वर्षाच्या सुुरुवातीलाही त्यांनी आपलाच दबदबा अबाधित ठेवताना पदकाची कमाई केली. औरंगाबादच्या या गुणवंत जिम्नॅस्ट रिद्धी आणि सिद्धीने  यंदाच्या वर्षातील पहिल्याच खेलाे इंडिया यूथ गेम्स स्पर्धेत पदकावर बाजी मारली. याच अव्वल कामगिरीमुळे त्यांनी यजमान महाराष्ट्राच्या शिरपेचामध्ये मानाचा तुरा खाेवला. या दाेघींच्या यशाने आता महाराष्ट्राला पदक तालिकेमध्ये पहिल्याच दिवशी मानाचे स्थान मिळाले आहे. 

 

सिद्धीला सलग पदक; गतवर्षीही गाजवली स्पर्धा
औरंगाबादच्या सिद्धी हत्तेकरने या स्पर्धेत पदकांचा डबल धमाका उडवला. तिचे खेलाे इंडिया स्पर्धेतील हे दुसरे पदक ठरले. तिने यंदा पुण्यातील या स्पर्धेमध्ये राैप्यपदक पटकावले. तिने आपल्या गटात ४०.८५ गुणांची कमाई करताना दुसरे स्थान गाठले. तिला गतवर्षी दिल्ली येथे या स्पर्धेत राैैप्यपदकच हाेते. अाता त्यापाठाेपाठ रिद्धी राहिली. तिने या गटात कांस्यपदकाचा बहुमान पटकावला. तिने ४०.४५ गुणांसह तिसऱ्या स्थानावर धडक मारली. 

 

अखंड मेहनतीमुळेच पदकाची स्वप्नपूर्ती
खेलाे इंडिया यूथ गेम्ससारख्या माेठ्या स्पर्धेत पदक जिंकण्याचे स्वप्न उराशी बाळगुनच सिद्धी आणि रिद्धीने प्रचंड मेहनत केली. यामध्ये सातत्य ठेवल्यानेच त्यांना आपल्या कामगिरीचा दर्जाही उंचावता आला. याचेच फळ त्यांना या स्पर्धेत पदकाच्या रूपाने मिळाले आहे. तसेच त्यांची ही साेबत पदक जिंकण्याची माेहीमही कायम राहिली. त्याच्या या पदक जिंकण्याच्या कामगिरीचा आम्हाला सार्थ अभिमान आहे. आगामी स्पर्धांमध्येही त्यांनी असेच घवघवीत यश संपादन करावे. -प्रणिता हत्तेकर, पदक विजेत्या खेळाडूंची आई

 

भावाची मेहनत ठरली बहिणींसाठी प्रेरणादायी
वय वर्ष साडेतीन असताना रिद्धी व सिद्धीने भाऊ प्रथमेशची जिम्नाॅस्टिकमधील मेहनत जवळून पाहिली. नित्यनेमाने त्याची ही साधनाच दाेघींसाठी प्रेरणादायी ठरली. त्यांनी  या खेळात  करिअर घडवण्याचा निर्णय घेतला व वयाच्या चाैथ्या वर्षांपासून त्यांनी बारवरील कसरतीस सुरुवात केली. 

 

‘तपा’तल्या मेहनतीला पदकांची चमक 
वयाच्या साडे तीन व्या वर्षी जिम्नाॅस्टिकचा छंद जाेपासत रिद्धी, सिद्धी या जुळ्या बहिणींनी राष्ट्रीय पातळीवर नेत्रदीपक कामगिरी केली. आता १२ वर्षांच्या करिअरमध्ये स्पर्धेगणिक पदकांची कमाई करण्याची शैली अविरत जाेपासली. त्यामुळेच त्याच्या मेहनतीच्या तपर्श्चेला १५० पदकांची चमक मिळाली. खेलाे इंडियातील त्यांची कामगिरी लक्षवेधी ठरली. औरंगाबादच्या या जुळ्या बहिणींचे हे पदकाचे यश अनेक प्रतिभावंत युवांसाठी प्रेरणादायी ठरणारे आहे. 

बातम्या आणखी आहेत...