आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गतवेळी 0.3 ने हुकले सुवर्ण; आता 0.5 च्या आघाडीने चॅम्पियन; सिद्धीचा डबल धमाका

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे- थाेडक्यात दिल्लीत खेलाे इंडियाची चॅम्पियन हाेण्यापासून दुरवण्याचे सल उराशी बाळगली आणि याचा बहुमान मिळवण्यासाठी अहाेरात्र मेहनत घेतली. आणि यातूनच ०.३ च्या हुकलेले सुवर्णपदक आता ०.५ च्या आघाडीने मिळवण्याचा पराक्रम औरंगाबादच्या प्रतिभावंत जिम्नॅस्ट सिद्धीने गाजवला. ती गुरुवारी दुसऱ्या सत्राच्या खेलाे इंडिया यूथ गेम्स स्पर्धेत चॅम्पियन ठरली. तिने अन इव्हन इव्हेंटमध्ये सुवर्णपदक जिंकले. तिने ८.५५ गुणांची कमाई करून हा बहुमान पटकावला. त्यापाठाेपाठ तिची जुळी बहीण रिद्धीने पदकाची कमाई केली. तिने बाॅलेसिंग बीम प्रकारात १०.४५ गुणांसह तिसरे स्थान गाठले. यामुळे तिला कांस्यपदक देऊन गाैरवण्यात आले. तिचे या स्पर्धेत सलग दुसरे कांस्यपदक ठरले. नाशिकची धावपटू दुर्गा आणि ताईनेही आपापल्या गटात पदके जिंकली. त्यामुळे पुण्यातील छत्रपती शिवाजी क्रीडानगरीत खेलाे इंडिया यूथ गेम्समध्ये महाराष्ट्राच्या खेळांडूनी दमदार कामगिरीची लय कायम ठेवली आहे. या कामगिरीच्या जोरावर गुरुवारी महाराष्ट्राने ५ सुवर्णपदक पटकावले. आतापर्यंत महाराष्ट्राच्या संंघाने १५ सुवर्णासह ५७ मेडल आपल्या खिशात घालत स्पर्धेत आघाडी घेतली आहे. 

 

विविध क्रीडा प्रकारात खेळणाऱ्या खेळाडूंना व्यासपीठ मिळावे यासाठी केंद्र सरकार व राज्य सरकारच्या वतीने खेलो इंडिया स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेत पहिल्या दिवसांपासून महाराष्ट्राच्या संघाच्या खेळांडूनी आपली प्रबल दावेदारी निर्माण केली आहे. वेटलिफ्टींगमध्ये ३ सुवर्ण, कुस्तीमध्ये १ सुर्वणासह १५ पदके मिळवत महाराष्ट्राच्या संघाने आघाडी घेतली होती. महाराष्ट्राच्या संघाने सुवर्णपदकांची चांगलीच लयलुट केली. जिन्मॅस्टिक प्रकारात औरंगाबादच्या सिध्दी हत्तेकर, मुंबईचे श्रेया भांगळे,क्रिशा छेडा, मनिष गाढवे, श्रेयस मंडलिक यानी सुवर्ण कामगिरी केली. याच बरोबरच अॅथलेस्टिकमध्येही महाराष्ट्राच्या संघाने आपले खाते सौरभ रावत यांच्या रूपात उघडले. १५०० मीटर धावण्याच्या स्पर्धेत सौरभने सुवर्ण पदक आपल्या नावे केले. याच बरोबर स्विमिंगमध्ये १०० मीटर ब्रेस्टस्ट्रोकमध्ये मुंबईची करीनाने १:१६.८२ अशी वेळ नोंदवत सुवर्ण पटकावले. अंडर-२१ महिला गटात १०० मीटर ब्रेस्टस्ट्रोक मध्ये पुण्याची शरॉन शहाजु हिने १:१६.८६ अशी वेळ नोंदवत सुर्वण पदक मिळवले. 

जेकब ठरला चॅम्पियन : मुलांच्या २१ वषार्खालील विभागातील ६१ किलो वजनी गटात जेकब व्हान्लाल्तालुंगा याने सुवर्णभरारी केली. त्याने स्नॅचमध्ये ११४ किलो तर क्लीन व जर्कमध्ये १३९ किलो असे एकूण २५३ किलो वजन उचलले. अरुणाचल प्रदेशच्या चारु पेसी याने स्नॅचमध्ये ९७ किलो तर क्लीन व जर्कमध्ये १३० किलो असे एकूण २२७ किलो वजन उचलले. 

 

आज तेजसवर नजर 
नॅॅशनल रेकाॅर्ड हाेल्डर तेजत आज शुक्रवारी खेलाे इंडिया युथ गेम्समध्ये चॅम्पियन हाेण्यासाठी ट्रॅकवर उतरणार आहे. त्याने गुुरुवारी १७ वर्षाखालील मुलांच्या ११० मीटर अडथळा शर्यतीच्या गटाची फायनल गाठली. त्याने सेमीफायनलमध्ये दुसऱ्या स्थानावर धडक मारली. त्याने १४.४६ सेंकदांमध्ये निश्चित अंतर गाठले. यासह ताे फायनलसाठी पात्र ठरला. त्याने गत महिन्यात राष्ट्रीय स्पधॅेदरम्यान विक्रमाची नाेंद केली. प्रशिक्षक सुरेंद्र माेदी यांच्या मार्गदर्शनाखाली ताे सध्या प्रशिक्षण घेत आहे. 

 

जेरेमी विक्रमासह चॅम्पियन 
आशियाई कनिष्ठ स्पर्धेतील पदक विजेत्या जेरेमीने आता पुण्यातील स्पर्धेत डबल धमाका उडवला. त्याने विक्रमासह सुवर्णपदकाची कमाई केली. त्याने वेटलिफ्टिंगमध्ये चॅम्पियन हाेण्याचा बहुमान पटकावला. त्याने स्नॅचमध्ये १२२ किलो वजन उचलून गुलाम नवी याचा ११२ किलो हा विक्रम मोडला. त्याने क्लीन व जर्कमध्ये १५६ किलो आणि एकूणात २७८ किलो वजन उचलले. अरुणाचल प्रदेशच्या मार्किओ तारिओ याने स्नॅचमध्ये १०४ किलो तर क्लीन व जर्कमध्ये १४२ किलो असे एकूण २४६ किलो वजन उचलले आणि रौप्यपदक पटकाविले.

 

मिझाेरामच्या वेटलिफ्टर झाकुमाने पटकावले सुवर्णपदक 
१७ वषार्खालील ६१ किलो गटात मिझोरामच्या झाकुमा याने सुवर्णपदकाची कमाई केली. त्याने स्नॅचमध्ये ११४ किलो तर क्लीन व जर्कमध्ये १४० किलो असे एकूण २५४ किलो वजन उचलले. जेकबने स्नॅचमध्ये ११४ किलो तर क्लीन व जर्कमध्ये १३९ किलो असे एकूण २५३ किलो वजन उचलले आणि रौप्यपदक पटकाविले. त्याचे थाेडक्यात सुवर्णपदक हुकले.

बातम्या आणखी आहेत...