आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराएंटरटेन्मेंट डेस्क: 'जीव झाला येडापिसा' मालिकेमध्ये लष्करे कुटुंब प्रत्येक सण मोठ्या जल्लोषात साजरा करतात. मकरसंक्रांत हा सण महाराष्ट्रात अतिशय उत्साह, आनंदामध्ये साजरा केला जातो. मकरसंक्रांतला सुवासिनी एकमेकिंना सुगडयाचे वाण देतात या वाणात हरभरे, मटर, बोरं, उस, गहु, तीळ, नाणे, असे असते. मालिकेमध्ये सिद्धी आणि शिवाच्या नात्याची एक गोड सुरुवात झाली आहे.
सिद्धीच्या मनात शिवाबद्दल आता प्रेम फुलू लागले आहे. सिध्दी आणि शिवाची लग्नानंतरची पहिली मकर संक्रांत मोठ्या उत्साहात पार पडणार आहे. मकरसंक्रांतीला काळे कपडे घालण्याची प्रथा आहे. सिध्दी काळ्या साडी मध्ये खूपच गोड दिसते आहे यात शंका नाही. मकर संक्रांतच्या निमित्ताने आत्याबाई शिवाच्या घरी येणार आहेत. सिध्दीने मकर संक्रांतीच्या मुहूर्तावर आत्याबाईंना पहिल्या हळदी कुंकु आणि तिळगुळाचा मान दिला.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.