आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शरीर निरोगी ठेवण्यासाठी प्रभावी ठरतो हा व्यायाम, 100 कॅलरी 5 मिनिटांत जळतात

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

साइड प्लँक एक सोपा व्यायामप्रकार आहे. तो करण्यासाठी सर्वप्रथम कूस बदलून झोपा आणि आपला एक हात व कोपरावर शरीराचा संपूर्ण भार देत शरीर हवेत उचला. आता दुसरा हात शरीराच्या समांतर ठेवा. मात्र, हे करताना तुमचे पाय आणि कंबर सरळ असली पाहिजे. आता शक्य होईल तितका वेळ या अवस्थेत राहा. पुन्हा दुसऱ्या कुशीवर झोपून ही प्रक्रिया करा. कोअर मसल्स बळकट बनवण्यामध्ये हा व्यायाम फायदेशीर आहे. यामुळे शरीराचे संतुलनही चांगले राहते. सिक्स पॅक अॅब्स बनवण्यासाठीही ही स्थिती परिणामकारक आहे. याशिवाय ज्या लोकांचा पाठीचा मणका पुढच्या दिशेने झुकलेला असतो त्यांच्यासाठीदेखील साइड प्लँक व्यायाम करणे फायद्याचे ठरते. प्लँकचे व्यायामप्रकार निरोगी शरीरासाठी खूप फायदेशीर आहेत. 


वेदना कमी होतील 
हा व्यायाम मान आणि पाठीच्या मणक्यासाठी खूप उपयुक्त आहे. यामुळे कणा मजबूत होतो. तसेच बराच वेळ बसून राहिल्याने किंवा वजन उचलल्याने होणाऱ्या खांदे व कंबरदुखीपासूनही आराम मिळतो. 


पोटासाठी फायदेशीर 
हा व्यायाम केल्याने रेक्टस अॅब्डोमिनल आणि ट्रान्सव्हर्स अॅब्डोमिनलचे स्नायू बळकट होतात. तुम्हालाही पोटावरील चरबी कमी करायची असेल तर तुम्ही हा व्यायाम केला पाहिजे. परिणाम लवकर दिसतील. 


इजा होण्याचा धोका कमी राहतो 
स्नायू लवचिक असणे खूप गरजेचे आहे. कारण यामुळे लचक किंवा इजा होण्याचा धोका असतो. प्लँकमुळे तुमचे खांदे, हॅमस्ट्रिंग आणि कॉलर बोन ताणले जातात आणि त्यांचा लवचिकपणा टिकून राहतो. 


एकाग्रता वाढेल 
यामुळे मेंदू शांत राहतो आणि एकाग्रता वाढते. शरीरासाठी हा व्यायाम उत्तम आहे. लवचिकता वाढवण्यासाठी हा व्यायाम करणे फायद्याचे ठरेल. 


पायांना मिळेल आकार 
या व्यायामाचा मुख्य भार पायांवर असतो. मांड्यांपासून ते पायांच्या पंजापर्यंतच्या सर्व स्नायूंचा व्यायाम प्लँकमध्ये होतो. यामुळे स्नायू बळकट होतात आणि पायांना चांगला आकारही मिळतो. ज्या लोकांच्या पायांना गोळे येतात त्यांच्यासाठीदेखील हा व्यायाम खूप फायद्याचा आहे. 


- 02 मिनिटे दररोज केलेला प्लँक व्यायाम सिट अप्स आणि क्रंचेसपेक्षाही चांगले परिणाम देतो. 
- साइड प्लँक व्यायाम केल्याने 100 कॅलरी 5 मिनिटांत जळतात 


प्लँकचे प्रकार 
प्लँकचे वेगवेगळे प्रकारही तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकतात. तुम्ही साइड प्लँकसोबतच स्टँडर्ड प्लँक, नी प्लँक, प्लँक विथ शोल्डर टचेस, फोरआर्म प्लँक, रिव्हर्स प्लँक आदी प्रकारांमुळेही फिटनेस राखू शकता. 


केव्हा करू नये? 
- सर्जरीनंतर 
- गरोदरपणी 
- जांघ किंवा पाय दुखत असल्यास 
- लठ्ठ असल्यास 

बातम्या आणखी आहेत...