आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'मला बाजुला करून नवजोत सिंग सिद्धूला मुख्यमंत्री बनायचं'- मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पतियाळा(पंजाब)- पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग आणि राज्य कॅबिनेट मंत्री नवजोत सिंग सिद्धू यांच्यात काहीतरी कुरकूर सुरू आहे. लोकसभा निवडणूक 2019 मध्ये तिकीट न मिळाल्याने सिद्धूची पत्नी नवजोत कौर सिद्धूने कॅप्टन अमरिंदर सिंग यांच्याविरूद्ध मोकळेपणाने नाराज असल्याचे सांगितले, याचे सिद्धूनेही समर्थन केले आहे. या दरम्यान सीएम अमरिंदर यांनी सिद्धूंना महत्वाकांक्षी असल्याचे सांगितले, तसेच सिद्धूला पंजाबचा मुख्यमंत्री बनायचे असल्याचेही ते म्हणाले. 

 

पंजाबच्या 13 मतदारसंघातसाठी सातव्या टप्प्यात मतदान होत आहे. सीएम कॅप्टन अमरिंदर सिंगंनी पटियालाच्या पोलिंग बुथ क्रमांक 89 वर आपले मतदान केले. मतदान झाल्यावर नवज्योत सिंग सिद्धूबद्दल म्हणाले- 'नवजोत सिंग सिद्धूसोबत माझे कोणतेच वाद नाहीयेत. जर तो महत्त्वकांक्षी असेल तर माझी त्यात काहीच हरकत नाहीये. लोकांच्या आपेक्षा असतात. मी त्यांना लहानपणापासून ओळखतो. माझ्या त्यांच्यासोबत कोणताच वैचारीक मतभेद नाहीये. त्यांना बहुतेक मला हटवून मुख्यमंत्री व्हायचे आहे.' 


अमरिंदर यांनी लोकसभेत काँग्रेस जिंकणार असे म्हणत सांगितले की, 'राज्यात शांतीने मतदान होत आहे. तरनतारनमद्ये हत्येचे प्रकरण समोर आले आहे, पण पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार हे आपसातील वादामुळे झाले आहे. कायदा-सुव्यवस्था चांगल्याप्रकारे राखली जात आहे. आम्ही भाजप आणि अकाली दलाला मात देऊ.' 


तिकीट न मिळ्याल्यामुळे नाराज नवजोत कौर
नवजोत कौर यांनी आरोप लावला आहे की, अमरिंदर सिंगमुळेच अमृतसरवरून निवडणुकीचे तिकीट मिळाले नाहीये. त्या म्हणाले अमरिंदर सिंग आणि पार्टी महासचिव पंजाब प्रभारी आशा सिंग या दोघांनी मला तिटीक न मिळ्याची पूर्ण प्रयत्न केले होते. त्योसोबतच मागच्या वर्षी अृतसरमध्ये दसऱ्याच्या दिवशी रेल्वे अपघात झाला होता, त्यामुळे येथील जनता मला निवडूण देणार नाही. असे त्यांना वाटत असावे म्हणून त्यांनी मला अमृतसरमधून उमेदवारी दिली नाही.