• Home
  • Sports
  • Siemens Biles is the third most fit female player in the world

फिटेस्ट इन वर्ल्ड / सिमाेन बाइल्स सलग तिसऱ्यांदा जगात सर्वात फिट महिला खेळाडू; राेनाल्डाेची पाचव्या स्थानी घसरण

अमेरिकेतील ६६ वर्षे जुन्या ‘स्पाेर्ट्स इलस्ट्रेटेड’ मासिकाने जगातील टाॅप-५० फिट खेळाडूंची नावे  जाहीर

वृत्तसंस्था

Feb 11,2020 09:24:00 AM IST

न्यूयाॅर्क - अमेरिकेची युवा जिम्नॅस्ट सिमाेन बाइल्स सातत्यपूर्ण कामगिरीने चर्चेत असते. यासाठी घेत असलेल्या मेहनतीचा तिला माेठा फायदा झाला. यातूनच तिने आता जगातील सर्वात फिट (तंदुरुस्त) महिला खेळाडू हाेण्याचा बहुमान पटकावला. यासाठी तिची सलग तिसऱ्यांदा निवड झाली आहे. अमेरिकेतील प्रसिद्ध आणि ६६ वर्षांतील जुन्या स्पाेर्ट॰स इलस्ट्रेटेडने साेमवारी जगभरातील टाॅप-५० फिट खेळाडूंच्या नावाची घाेषणा केली. यामध्ये जगभरातील अव्वल दर्जाच्या प्रत्येकी २५ महिला आणि पुरुष खेळाडूंचा समावेश आहे. पुरुषांच्या गटात ग्रीसच्या बास्केटबाॅलपटू जियानिस एंटेटाेकाेंपाेने अव्वल स्थान पटकावले. याच गटात नंबर वन टेनिसपटू नाेवाक याेकाेविकने दुसऱ्या स्थानावर धडक मारली. यात गतवर्षी दुसऱ्या स्थानावर असलेल्या सुपरस्टार फुटबाॅलपटू क्रिस्टियानाे राेनाल्डाेची आता पाचव्या स्थानावर घसरण झाली.

सिमोन आठवड्यातील ३२ तास जिममध्ये, साेमवार- बुधवारी सलग पाच तास

जगातील सर्वात फिट महिला हाेण्यासाठी सिमाेन बाइल्स प्रचंड मेहनत घेते. ती आठवड्यातील ३२ तास जिम करते. तिने वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये २५ पदके जिंकली. वाॅल्ट, बॅलन्स बीम, फ्लाेअर एक्सरसाइझमध्ये परफेक्शनसाठी तिला स्पीड, लवचिकता आणि स्ट्रेंथची गरज असते. त्यामुळे ही २२ वर्षीय जिम्नॅस्ट जिम करते. साेमवार आणि बुधवारी ती प्रत्येकी पाच तास जिममध्ये व्यायाम करते.

याच्या आधारे हाेते निवड

> खेळाडूंची वर्षभरातील कामगिरी
> खेळाडूंची त्या खेळातील शारीरिक स्ट्रेंथची गरज लक्षात घेतली जाते.
> खेळाडूंचे ट्रेनिंग आणि डाएट.
> पाॅवर, स्पीड, स्ट्रेंथ, लवचिकता, क्षमता यासारख्या शारीरिक संबंधीत गाेष्टींवर नजर असते.

जियानिस दरदिवसाचे वर्कआऊट वेगळे, वर्षभरात दाेन इंच उंची वाढवली


ग्रीसचा जियानिस हा बास्केटबाॅलपटू आपल्या उंचीमुळे अधिकच चर्चेत आहे. एनबीएमध्ये खेळत असलेल्या या खेळाडूंची उंची ६ फूट ९ इंच आहे. तसेच वजन ८६ किलाे आहे. ताे यासाठी प्रचंड कसरत करताना दिसताे. यासाठी ताे नित्यनेमाने वर्कआऊट वेगळ्या पद्धतीने करताे. यातूनच त्याला वर्षभरात दाेन इंचांनी आपली उंची वाढवता आली. ताे साेमवार आणि बुधवारी अपर बाॅडी, मंगळवार, गुरुवारी लाेअर बाॅडीचे वर्कआऊट करताे. रविवारी पूर्णपणे दिवसभर विश्रांती करताे.

टॉप-25 पुरुषांमध्ये १३ खेळांचे खेळाडू, सर्वाधिक सहा धावपटू

पुुरुषांच्या गटात १३ खेळांतील खेळाडूंचा समावेश आहे. यामध्ये सर्वाधिक सहा खेळाडू हे अॅथलेटिक्सचे आहेत. दुसऱ्या स्थानावर बास्केटबाॅल आणि अमेरिकन फुटबाॅलचे आहेत.


टॉप-25 महिला खेळाडू १४ खेळ प्रकारांतील; सर्वाधिक १० धावपटू

महिलांच्या गटात टाॅप-२५ मध्ये १४ खेळ प्रकारांतील खेळाडूंचा समावेश आहे. सर्फिंग, हाॅकी, वाॅटर पाेलाे, राॅक क्लायंबिंग, बास्केटबाॅलचा समावेश आहे. यात सर्वाधिक १० खेळाडू धावपटू आहेत.


टॉप-10 महिला खेळाडू


खेळाडू देश खेळ प्रकार


सिमोन बाइल्स अमेरिका जिम्नाॅस्टिक


अमांडा न्यून्स ब्राझील मिक्स मार्शल आर्ट््स


क्लेरेसा शील्ड्स अमेरिका बॉक्सिंग


मिकाएला शिफरिन अमेरिका स्कीइंग


कॅटी लेडेकी अमेरिका जलतरण

टॉप-10 पुरुष खेळाडू


खेळाडू देश खेळ प्रकार


ए. जियानिस ग्रीस बास्केटबॉल


नोवाक याेकाेविक सर्बिया टेनिस


मॅट फ्रेजर अमेरिका क्रॉसफिट


कानेलो अल्वारेज मेक्सिकाे बॉक्सिंग


क्रिस्टियानो रोनाल्डो पाेर्तुगाल फुटबॉल

X