आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सरकारी उपायांमुळे अर्थव्यवस्थेत सुधारणेचे संकेत, देशातील मध्यमवर्ग सणाच्या हंगामात खर्चाच्या तयारीत

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली/ मुंबई - सरकारने उचलेल्या पावलांमुळे सणासुदीच्या दिवसांत ग्राहकांच्या मागणीत तेजी येईल,अशी आशा बाजारपेठेला आहे. सर्वसाधारणपणे वार्षिक विक्रीत २०-३० टक्के वाटा सणातील विक्रीचा असतो. कंपन्या या कालावधीत उत्पादनांच्या जास्त श्रेणी आणतात. सणाचा हंगाम ओणमसोबत १ सप्टेंबरपासून सुरू होतो तो ऑक्टोबरअखेरपर्यंत दिवाळीत संपतो. 

ज्युसर, एयर प्युरिफायर, इलेक्ट्रिक शेव्हर तयार करणऱ्या फिलिप्स कंपनीनुसार, सणांसाठी कंपनीने खर्चांत १०-१५% ची वाढ केली आहे. कंपनीने गेल्या वर्षीच्या तुलनेत नवीन उत्पादनाची लाँचिंगही जास्त केली आहे. बहुतांश कंपन्यांच्या म्हणण्यानुसार, यंदा किंमत वाढण्याची शक्यता कमी आहे. ज्वेलरी रिटेलर्स किंमती वाढल्यामुळे मार्केटिंगवर जास्त लक्ष देत आहेत आणि एक्सचेंज ऑफरही देत आहेत.

सोन्याचे दागिने बदलण्याच्या प्रकारात कल्याण ज्वेलर्सला १०% वाढ मिळाली आहे. कंपनी लग्न आणि सणाच्या हंगामात वधूसाठीच्या दागिन्यांची माेहीम राबवत आहे. घड्याळ व ज्वेलरी रिटेलर टायटनला जूनमध्ये संपलेल्या तिमाहीत उत्पन्नात १३.३% वाढ झाली  होती. कंपनीने वार्षिक एक्सचेंज ऑफर सुरू केली. या वेळी जाहिरातींवर २०,००० कोटी खर्चाचा अंदाज आहे.
 
 

मोबाइल :  सॅमसंगने लाँच केली फायनान्स स्कीम, कर्जावर घेता येईल गॅलेक्सी स्मार्टफो
 
सॅमसंग इंडियाने डिजिटल फायनान्स प्लॅटफॉर्म लाँच केला आहे. हा प्लॅटफॉर्म पूर्णपणे डिजिटल असेल आणि त्यासाठी स्टोअरवर जाऊन ग्राहक २० मिनिटांच्या आत कर्ज प्राप्त करू  शकतील. सॅमसंगशिवाय शाओमी रेडमी सिरिजवर ३०००-४००० रुपयांपर्यंतची सूट देत आहे. अन्य हँडसेट कंपन्या ओप्पो, मोटो आणि रियलमीही २ ते ३ हजारांची सूट देत आहेत.

येत्या एका वर्षात ५०,०००० लोकांना नोकरी देईल हँडसेट कंपन्या : येत्या वर्षभरात हँडसेट मॅन्युफॅक्चरर्स सुमारे ५० हजार लोकांची भरती करेल. ही भरती कंत्राटी आणि एंट्री-लेव्हलची असेल. आर्थिक वर्ष २०१८-१९ मध्ये मोबाइल हँडसेटची निर्यात आठपट जास्त होऊन ११,२०० कोटी रुपयांवर पोहोचला आहे. ही पहिलीच स्थिती आहे, जेव्हा हँडसेट अर्थव्यवस्थेत आलेली मरगळ दूर करण्यासाठी ३ ते ७ ऑक्टोबरपर्यंत २५० जिल्ह्यांत बँकांकडून कर्ज वाटपासाठी सार्वजनिक बैठक घेतली जाईल. याअंतर्गत प्रत्येक प्रकारच्या खरेदीसाठी कर्ज दिले जाणार आहे.
 

टिकाऊ वस्तू : २०२० पर्यंत या क्षेत्राची बाजारपेठ ३.२ लाख कोटींहून जास्त होईल
> भारत एकमेव देश आहे जिथे मोबाइल आणि स्मार्टफोनच्या विक्रीत वाढ पाहावयास मिळत आहे. मेक इन इंडिया मोहिमेमुळे अनेक विदेशी कंपन्या आता भारतात स्मार्टफोन तयार करत आहेत. यामुळे किंमतीत मोठी घट होईल.
> २०१७ मध्ये टिकाऊ वस्तू बाजार १५५० कोटी डॉलर(सुमारे १ लाख कोटी रु.) पर्यंत पोहोचला होता. आर्थिक वर्ष २०२० पर्यंत ही ४६५४ कोटी डॉलर(३.२ लाख कोटी रु.)पर्यंत पोहोचण्याचा अंदाज आहे.

> भारतीय इलेक्ट्रॉनिक्स बाजाराच्या ४१% च्या सीएजीआरच्या वृद्धीसह वाढत २०२० मध्ये ४० हजार कोटी डॉलर(२८ लाख कोटी रु.)पर्यंत पाेहोचण्याचा अंदाज आहे. आर्थिक वर्ष २०१७ मध्ये हे १० हजार कोटी डॉलर(सुमारे ७ लाख कोटी रु.)चा होता.

> दूरचित्रवाणी उद्योगात भारत जगातील तिसरी सर्वात मोठी बाजारपेठ आहे. आर्थिक वर्ष २०२० मध्ये याची ९.८% ची सीएजजीआरसह विकास करण्याचा अंदाज आहे. ओटीटी कंटेंटमुळे स्मार्ट टीव्हीच्या विक्रीत तेजी येत आहे.

> ट्रक कंपन्या ३,७५,००० रुपयांची सूट लहान व मोठ्या ट्रकवर देत आहेत.
 

रियल इस्टेट : २०१९  आधी ६ महिन्यांत १० टक्के% गुंतवणूक, मुंबई व चेन्नईत विक्री जास्
गेल्या काही वर्षांतील आर्थिक सुस्ती झेलणाऱ्या स्थावर मालमत्ता क्षेत्रात तेजी परतली आहे. चेन्नई आणि मुंबईसारख्या महानगरांमध्ये सदनिकांची विक्री वाढली, ऑफिस स्पेसची मागणीतही २०१८ मध्ये तेजी राहिली हाेती, २०१९ मध्ये यात आणखी शहरांत इन्व्हेंटरी घटतेय
 
> ऑफिस स्पेसमध्ये २०१८ मध्ये चांगली वाढ या वर्षीही वेगवान राहणे शक्य. ऑफिस स्पेसच्या वाढत्या मागणीसोबत बाजारात पुरवठ्याच्या दर्जात सुधारणा झाली आहे.
> प्राइवेट इक्विटी फर्म्सने या वर्षीच्या पहिल्या सहा महिन्यात २९ हजार कोटी रुपयांची गुंतवणूक केली. गेल्या वर्षीच्या तुलनेत १०% जास्त आहे.
> रिटेलमध्ये १-१.२ कोटी चौ.फूटाच्या मागणीचा अंदाज आहे. इंडस्ट्रीयल/ लॉजिस्टिक्स २०२० पर्यंत यात ६ कोटी चौ.फूट स्पेस आणखी जोडण्याची शक्यता.
 
> मुंबईची कंपनी लोटस डेव्हलपर्सचे चेअरमन आनंद पंडित म्हणाले, की मुंबईमध्ये कमर्शियल रियल्टी क्षेत्रात तेजी ९% पर्यंतचे उत्पन्न देत आहे.
 
> चेन्नईमध्ये रियल इस्टेटच्या विक्रीत या वर्षीच्या पहिल्या सहामहीत २५% पर्यंत वाढली. चेन्नई ऑटो क्षेत्राचे हब आहे. या क्षेत्रात मंदीचे सावट असल्याचे म्हटले जाते, तरीही वाढ आहे.
 
> रहिवासी जागेबाबत सरकारच्या पावलांमुळे विक्री व नवे प्रकल्प लाँच होण्याची शक्यता आहे आणि मध्यम श्रेणीत वेगवान विकासाचा अंदाज आहे. परवडणाऱ्या घरांच्या विक्रीतही तेजी राहील.
>  सूट, ईएमआय आणि भेट आदी शहर स्तरावर किंवा प्रोजेक्टनुसार निश्चित होत आहे. अनेक मॉड्यूलर किचन तर कुठे होम अप्लायन्सेस देऊ केले जात आहेत. १०-१२% सवलतीचीही तयारी आहे.
> रियल इस्टेट असोसिएशन ऑफ कांदिवलीचे निवृत्त सचिव कल्पेश मशरू यांच्या म्हणण्यानुसार, ७५ लाखापासून २ कोटीपर्यंत सदनिका विक्रीत अडचण नाही.
 
खरेदीदारांची चांगली प्रतिक्रिया मिळत आहे. मायक्रो स्तरावर काही सेगमेंट्स खूप चांगली कामगिरी करताहेत.
- डॉ.निरंजन हीरानंदानी, संस्थापक व एमडी, हीरानंदानी ग्रुप
 
दूसऱ्या क्षेत्रांत सणाचा परिणाम चांगला राहील. यामुळे रियल इस्टेट क्षेत्रातही मागणी वाढण्याची आशा आहे.
- सतीश मागर, 
राष्ट्रीय अध्यक्ष, क्रेडाई
 
 

बातम्या आणखी आहेत...