आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अर्थव्यवस्थेमध्ये सुधारणांचे संकेत, नाेव्हेंबरमध्ये पीएमआय इंडेक्स वाढून 51.2 %

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - देशाच्या उत्पादन क्षेत्रात नाेव्हेंबरमध्ये सुधारणा झाली आहे. परंतु नवीन ऑर्डर आणि उत्पादनात घट झाल्याने या क्षेत्राच्या वाढीचा वेग मंदावला आहे. आयएचएस मार्केट इंडिया मॅन्युफॅक्चरिंगचा पर्चेस मॅनेजर्स निर्देशांक (पीएमआय) नाेव्हेंबरमध्ये वाढून ५१.२ वर आला. ऑक्टाेबरमध्ये पीएमआय ५०.६ इतका हाेता. जाे दाेन वर्षांचा नीचांक हाेता. निर्देशांक ५० च्या वर असणे हा उत्पादन विस्ताराचा सूचक असताे. उत्पादन क्षेत्राचा पीएमआय सलग २८ व्या महिन्यात ५० च्या वर आहे. नाेव्हेंबरच्या निर्देशांकावरून उत्पादन क्षेत्राच्या स्थितीत थाेडी सुधारणा जरूर झाल्याचे वाटत आहे. साेमवारी जाहीर झालेल्या पीएमआय सर्वेक्षण अहवालामध्ये सध्या उत्पादन क्षेत्रात सुधारणा झाली आहे. परंतु या क्षेत्रातील घडामाेडी वर्षाच्या सुरुवातीच्या तुलनेत सध्या मंद असल्याचे अहवालात म्हटले आहे. आयएचएस मार्केटचे मुख्य अर्थतज्ञ पाेलियाना डी लामा यांच्या मते उत्पादन क्षेत्राच्या वाढीचा दर आॅक्टाेबरमध्ये थंडावल्यानंतर नाेव्हेंबरमध्ये चांगला वाढला आहे. परंतु आताही कारखान्यांच्या ऑर्डर, उत्पादन आणि निर्यातीमधील वाढ २०१९ च्या सुरुवातीच्या तुलनेत खूप कमी आहे. लिमा म्हणाल्या, वाढीच्या दरात गती न येण्याचे मुख्य कारण मागणी मंदावल्याचे आहे. अहवालानुसार नाेव्हेंबरमध्ये कंपन्यांकडून बाजारात आलेली नवीन उत्पादने, मागणीत अपेक्षित वाढ आणि स्पर्धेचा भार कमी झाल्याने या क्षेत्राच्या घडामाेडींमध्ये सुधारणा झाली आहे. परंतु भविष्यातील बाजाराबद्दल कंपन्यांच्या आत्मविश्वासाचे प्रमाण कमी आहे. अर्थव्यवस्थेत काही अनिश्चितता असल्याचे यावरून दिसते.

बातम्या आणखी आहेत...