आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मोठ्या बदलांच्या खुणा...

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

  • विरोधकांची ऐतिहासिक भेट...

धमक्यांनंतर हुकूमशहा किम जोंगच्या घरी जाऊन ट्रम्प यांनी घेतली भेट

२८ जून : अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी उत्तर कोरियाचे शासक किम जोंग उन यांची दक्षिण कोरियात भेट घेतली. त्यानंतर जोंग यांच्यासह ट्रम्प यांनी उत्तर कोरियात प्रवेश केला. उत्तर कोरियाच्या जमिनीवर पाऊल ठेवणारे ते पहिले अमेरिकेचे अध्यक्ष ठरले आहेत.

ट्रम्प यांच्यावर महाभियोग : डिसेंबरमध्ये ट्रम्पच्या विरोधात महाभियाग प्रकरणी प्रतिनिधी सभेत मतदान झाले. तेथे ट्रम्प यांच्या विरोधात मतदान झाले आणि ते मंजूरही झाले.

दक्षिण कोरियाने १६ जूनला उत्तर कोरियाला लागून असलेली सर्वात धोकादायक सीमा ६६ वर्षांत पहिल्यांदाच पर्यटकांसाठी खुली केली.

  • पंतप्रधान बदलले ब्रिटनमध्ये...

ब्रेक्झिटमुळे समाज व राजकारणात बदल; थेरेसा गेल्या, जॉन्सन आले

१३ डिसेंबर : ब्रिटनच्या सार्वत्रिक निवडणुकीत हुजूर पक्षाने ३६५ जागा जिंकल्या. बोरिस जॉन्सन पंतप्रधान झाले. ते तीन वर्षांतील तिसरे पंतप्रधान आहे. हुजूर पक्षाला एवढा मोठा विजय मिळण्याची ३२ वर्षांतील ही पहिलीच वेळ. ब्रेक्झिटवरून हुजूर पक्षाला मोठा विरोध होता. माजी पंतप्रधान थेरेसा मे यांनी पक्षातील मतभेदामुळे राजीनामा दिला होता.

ऑस्ट्रेलियात निवडणूक : निवडणुकीत स्कॉट मॉरिसन सलग दुसऱ्यांदा पंतप्रधान झाले. १५१ पैकी ७४ जागा जिंकण्यात यश मिळाले. 

कॅनडा निवडणूक : पीएम जस्टिन ट्रूडोंचा लिबरल पक्ष निवडणुकीत सर्वात मोठा पक्ष ठरला. पण पक्षाला स्वबळावर बहुमत मिळाले नाही.

  • मास्टरमाइंड देशद्रोही

मुशर्रफ यांना फाशीची शिक्षा, कोर्ट म्हणाले-मृत्यू झाल्यास चौकात टांगा... 

२७ ऑक्टोबर : इस्लामाबादमध्ये जमियत उलेमा-ए-इस्लामचे प्रमुख मौलाना फजलुर रहमान यांनी इम्रान सरकारविरोधात १३ दिवस आझादी मार्च आयोजित केला. हे स्वातंत्र्यानंतरचे सर्वात मोठे आंदोलन होते.

मुशर्रफ : १९ डिसेंबरला पाकिस्तानचे माजी अध्यक्ष आणि कारगिलचे मास्टरमाइंड परवेझ मुशर्रफ यांना देशद्रोहाच्या गुन्ह्यात फाशीची शिक्षा झाली. कोर्टाने म्हटले की, मुशर्रफ मेले तरी त्यांचा मृतदेह फरपटत चौकात आणा आणि ३ दिवस तेथेच टांगून ठेवा.

नवाज शरीफ : १० वर्षांची शिक्षा भोगत असलेले माजी पंतप्रधान नवाज शरीफ यांची जेलमध्ये प्रकृती बिघडली. उपचारासाठी लंडनला गेले.

  • दहशतवादाचा म्होरक्या...

बोगद्यात लपलेला आयएस म्होरक्या बगदादी ठार, कुत्र्यामुळे सुगावा

२६ ऑक्टोबर : अमेरिकी लष्कराने सिरियात इस्लामिक स्टेटचा म्होरक्या अबू बकर-अल बगदादीला ठार केले. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी त्याला दुजोरा दिला. तो एका बोगद्यात लपला होता.

तुर्कीचा सिरियावर हल्ला : ९ ऑक्टोबरला सिरियातून अमेरिकी लष्कर हटल्यानंतर तुर्कीने तेथे बॉम्ब टाकण्यास सुरुवात केली. त्याचा परिणाम युरोप व दक्षिण आशियात झाला. २५० वर लोक या हल्ल्यांत ठार झाले. अमेरिकेने तुर्कीवर अनेक निर्बंध लादले.

तालिबान : जानेवारीत अफगाणिस्तानमध्ये अमेरिकेने तालिबानसमोर शांतता चर्चेचा प्रस्ताव मांडला, पण तालिबानने तो फेटाळला.
 

बातम्या आणखी आहेत...