आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ऑस्ट्रेलियातील वणव्यात अडकलेल्यांना शिखांची मदत, ३५० बॉक्समध्ये जेवण नेणारे भारतीय

2 वर्षांपूर्वीलेखक: प्रतिनिधी
  • कॉपी लिंक

मेलबर्न : ऑस्ट्रेलियातील जंगलात वणवा पेटल्याने मोसमात दुसऱ्यांदा आणीबाणी लावण्यात आली आहे. जंगलात पसरलेली आग शहरात पसरली. ही आग विझवण्यासाठी २००० हून अधिक अग्निशमन कर्मचारी दिवस-रात्र आग विझवण्यासाठी प्रयत्न करत आहेत. मेलबर्न शहरात शीख समाजाने मदत करण्यास पुढाकार घेतला आहे. या लोकांनी रात्रीतून ७०० किमी गाडी चालवत ब्रेडवूड भागात आग विझवणाऱ्या अग्निशमन कर्मचाऱ्यांपर्यंत ३५० पाकिटे पोहचवली आहेत. बुशफायर भागातही आग पसरलेली आहे. लोकांना सिडनीला पाठवण्यात येत आहे. शीख समाजाचे सचिव गुरजीतसिंग यांनी सांगितले, आम्ही ऑस्ट्रेलियात आलो तेव्हा आमच्याकडे फक्त दोन बॅगा होत्या. आज आमच्याकडे खूप काही आहे. या देशाने आम्हाला बरेच काही दिले. आम्ही लोकांना मदत करू शकतो. त्यामुळे अशा संंकटकाळात आम्ही त्यांच्यासोबत आहोत.

बातम्या आणखी आहेत...