आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुंबईत बंद शांततेत, व्यवहार सुरळीत ठाण्यात ठिय्या, वाशी बाजारपेठ ठप्प

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- मराठा समाजाने पुकारलेला बंद राजधानी मुंबईमध्ये शांततेत पार पडला. नवी मुंबर्इ अाणि ठाण्यात अायाेजकांनी बंदमध्ये सहभागी न हाेण्याचा निर्णय घेतला असला तरी या जिल्ह्यातील काही भागात दैनंदिन व्यवहार ठप्प हाेते. रेल्वे, बेस्ट, टॅक्सी सेवांसह सर्व व्यवहार सुरळीतपणे सुरू हाेते. बंद नसला तरी खबरदारीचा उपाय म्हणून लाेकांनी घरीच राहण्याचा निर्णय घेतल्यामुळे उपनगरीय गाड्यांना फारशी गर्दी नव्हती.  


मराठा क्रांती माेर्चाचे कार्यकर्ते सकाळी ११ वाजता वांद्रे येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमाेर माेठ्या संख्येने जमा झाले. या अांदाेलनाचे नेतृत्व तरुण महिलांनी केले.  तीन तास चाललेल्या ठिय्या अांदाेलनात कार्यकर्त्यांनी काेणत्याही घाेषणा न देता काळ्या फिती लावून मूखबंद अांदाेलन केले. मुंबई बंदची घाेषणा करण्यात अालेली नसली तरी  सुरक्षिततेचा उपाय म्हणून विविध ठिकाणी पाेलिस बंदाेबस्त तैनात करण्यात अाला हाेता. मध्य, पश्चिम अाणि हार्बरची लाेकल सेवा सुरळीत असली तरी उगाच धाेका नकाे म्हणून लाेकांनी घरीच राहणे पसंत केले. त्यामुळे लाेकल गाड्यांना नेहमीसारखी गर्दी नव्हती. 

 

बेस्ट बसेस, टॅक्सी सेवाही दिवसभर सुरळीत हाेती. दरम्यान, मुंबईतील काही शाळांनी खबरदारीचा उपाय म्हणून मुलांना शाळेत पाठवू नका, असे अावाहन केले हाेते. वाशी बाजारपेठेत शुकशुकाट हाेता. दादरच्या फूल अाणि भाजी मार्केटमधील व्यापाऱ्यांनीदेखील स्वत:हून व्यवहार बंद करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे दादरच्या बाजारात भाज्यांची अावक झाली नाही. मुंबईतील मस्यव्यवसायाची प्रमुख बाजारपेठ म्हणून ससून डाॅक अाेळखली जाते. मात्र, काेळी समाजाने बंदला पाठिंबा दिल्यामुळे  ससून डाॅकमधील मासळी बाजारात कडक बंद पाळण्यात अाला.

बातम्या आणखी आहेत...