आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

किरकाेळ घटनांचा अपवाद जिल्ह्यामध्ये बंद शांततेत; एसटी सेवा ठप्प, प्रवाशांची गैरसाेय

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक- सकल मराठा समाजाच्या वतीने मराठा अारक्षणाच्या मागणीकरिता गुरुवारी जिल्ह्यात बंद पाळत ठिकठिकाणी माेर्चे काढण्यात येऊन रास्ता राेकाे करण्यात अाला. बंदच्या पार्श्वभूमीवर एसटीची सेवाही ठप्प हाेती. त्यामुळे प्रवाशांची गैरसाेय झाली. जिल्ह्यात काेठेही तीव्र स्वरुपाची अनुचित घटना घडली नाही. 


कळवणला बसस्थानकात ठिय्या
आरक्षणासाठी बलिदान देणाऱ्यांच्या वारसांना ५० लाख रुपयांची मदत आणि मराठा समाजाला आरक्षण द्या आदी मागण्यांसाठी कळवणला मोर्चा काढून बसस्थानक परिसरात ठिय्या आंदोलन केले. संपूर्ण तालुक्यात कडकडीत बंद पाळण्यात आला. 


मालेगावी मराठा व मुस्लिमांचा रास्ता राेकाे
सकल मराठा समाजाच्या टेहरे फाट्यावरील तर मुस्लिमांच्या चंदनपुरी शिवारातील अांदाेलनामुळे मुंबई-अाग्रा महामार्ग पाच तास ठप्प झाला हाेता. दाभाडी, नांदगाव फाटा, जळगाव फाटा, अाघार बुद्रुक, चिंचवड फाटा येथेही रास्ता राेकाे करण्यात अाला. शहर व तालुक्यात कडकडीत बंद पाळण्यात अाला. 


चांदवडला रास्ता राेकाे :चांदवडला मुंबई-आग्रा महामार्ग चौफुलीवर सकाळी १० वाजता सकल मराठा समाजाच्या वतीने सुमारे एक तास रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. यामुळे वाहनांच्या सुमारे ५ किलोमीटर दूर रांगा लागल्या होत्या. 
ठेंगोड्यात पाेलिसांना निवेदन : ठेंगाेडा येथे रास्ता रोको करण्यात आला. यावेळी पोलिस हवालदार प्रकाश जाधव यांना निवेदन देण्यात अाले. 

अाराईत शासनाचा निषेध : आराई येथे कडकडीत बंद पाळून सटाणा-मालेगाव मार्गावर रास्ता रोकाे करत निषेध करण्यात आला. 
दिंडोरी तहसीलवर मोर्चा : दिंडोरी तहसील कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. यावेळी सरकारचा निषेध करत निवेदन देण्यात आले. 
नामपूरला बंद : येथे बंद पाळत बसस्थानक परिसरात दोन तास ठिय्या आंदोलन करण्यात अाले. बाजार समितीही बंद हाेती. 
येवल्यात बंद : येथील सकल मराठा समाजाने कडकडीत बंद पाळत प्रांताधिकारी कार्यालय आवारात ठिय्या आंदोलन केले. ममदापूर, राजापूर येथून सुमारे दीडशे दुचाकीस्वार रॅलीने या आंदोलनात दाखल झाले होते. 
निफाडला घाेषणाबाजी : सकाळी ११ वाजेच्या दरम्यान येथील शांतीनगर त्रिफुलीवर ठिय्या आंदोलन करण्यात आले. याप्रसंगी आंदोलकांनी आरक्षण मिळालेच पाहिजे या घोषणा देऊन आंदोलनस्थळ दणाणून सोडले. 
इगतपुरीत घाेषणाबाजी :येथील तहसील कार्यालयात ठिय्या आंदोलन करत घोषणा देण्यात आल्या. त्यानंतर विविध मागण्यांचे निवेदन देण्यात अाले. 

दिंडोरीत विद्यार्थी व प्रवाशांचे हाल : खबरदारी म्हणून बससेवा बंद ठेवल्याने दिंडोरी आगारातील बस वाहतूक पूर्णपणे बंद होती. विद्यार्थी व प्रवाशांचे हाल झाले. 


सिन्नरला सर्व सेवा ठप्प

शहर, तालुक्यात ठिय्या आंदोलन, मोर्चा, निषेध करत मराठा आरक्षणासह विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले. शाळा, महाविद्यालयांसह, दुकाने, खासगी कार्यालये कडकडीत बंद राहिली. ग्रामीण भागातही बंद पाळण्यात अाला. 

 

सटाण्यात मुस्लिम व धनगर समाजाच्या कार्यकर्त्यांचाही आंदोलनात सहभाग 
शहरातील सर्व व्यवहारही दिवसभर बंद ठेवण्यात आले. सकाळी १० वाजता छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ विंचूर-प्रकाशा राज्य महामार्गावर ३ तास ठिय्या आंदोलन छेडण्यात आले. कार्यकर्त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याविरुद्ध घोषणाबाजी करण्यात आली. राष्ट्रीय महामार्गावर इतर सर्वच रस्त्यांवरील वाहतूक तसेच एस. टी. सेवाही दिवसभर बंद राहिली. मराठा समाजबांधवांसोबत मुस्लिम व धनगर समाजाच्या कार्यकर्त्यांनी आंदोलनात सहभाग नोंदवला. 


८ लाख उत्पन्न बुडाले 
मालेगावी बुधवारी रात्री ९ वाजेपासूनच लांब पल्ल्यांची बस वाहतूक बंद ठेवण्यात अाल्याने अागाराच्या ३०० बसफेऱ्या रद्द हाेऊन सुमारे अाठ लाखांचे उत्पन्न बुडाल्याची माहिती अागारप्रमुख किरण धनवटे यांनी दिली. 


सिन्नरला ६५० फेऱ्या रद्द 
७४ बसच्या ६५० फेऱ्या रद्द करण्यात आल्या. आगाराचे सुमारे सात लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. रात्री मुक्कामी पाठवलेल्या बसही मध्यरात्रीपूर्वीच माघारी बोलावण्यात आल्या होत्या. 

बातम्या आणखी आहेत...