आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

करणच्या घरी झालेल्या पार्टीबाबत विकी कौशलने सोडले मौन; म्हणाला - व्हिडिओ बनण्याच्या पाच मिनिटे आधीपर्यंत करण जोहरची आई आमच्यासोबत होती

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - राष्ट्रीय पुरस्कार विजेता अभिनेता विकी कौशलवर करण जोहरच्या घरातील पार्टीवर इतर कलाकारांसेाबत ड्रग्स घेण्याचा आरोप लागला होता. हा आरोप अकाली दलचा नेता मजिंदर सिरसाने त्या पार्टीतील व्हिडिओ पाहून केला होता. या आरोपावर आता स्वत: विकी कौशलने खुलासा केला आहे. 

‘विकी म्हणाला...,‘त्या व्हिडिओमुळे आमच्या जीवनात तणाव निर्माण झाला होता. त्यात काहीच खरं नव्हतं. तो एक कौटुंबिक मेळावा होता. व्हिडिओ बनण्याच्या पाच मिनिट आधीपर्यंत करण जोहरची आई आमच्याबरोबर होती. तो व्हिडिओ जो अंदाज लावला गेला तसे तिथे काहीही घडले नाही.’
 
 
विकीने पुढे सांगितले..., जे लोक मला वैयक्तिक रूपाने ओळखत नाहीत ते एका व्हिडिओच्या आधारावर माझ्या आणि माझ्या इतर मित्रांवर अशा प्रकारचा अरोप लावू शकतात. ज्या लोकांना तुम्ही चांगल्या प्रकारे ओळखत नाही, त्यांच्यावर आरोप लावत आहात ही किती आश्चर्याची गोष्ट आहे. तुम्ही तर एका व्हिडिओच्या आधारे आपले मत मांडले, असे झाले असेल, हा प्रकार माझ्या समजण्यापलीकडेचा आहे. १० टक्के लोक व्हिडिओ पाहून आपले मत मांडतात. इतर ९० टक्के लोक त्या १० टक्के लोकांशी सहमत नसतात.
 
 
हा आरोप करण जाेहरने फेटाळला आहे. हे सर्व खोटे असल्याचे तो म्हणाला होता. त्यावेळी विकी डेंग्यूतून बरा होत होता. त्यामुळे तो निंबूसोबत गरम पाणी घेत होता. मात्र लोकांना ते वेगळेच वाटले, असे करण म्हणाला होता.